शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

उमरसरा येथे तरुणाचा निर्घृण खून

By admin | Updated: February 26, 2015 01:56 IST

सिमेंटच्या बाकावर झोपून असलेल्या एका तरुणाच्या डोक्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी टणक वस्तूने जोरदार प्रहार करून त्याला जागीच ठार केले.

यवतमाळ : सिमेंटच्या बाकावर झोपून असलेल्या एका तरुणाच्या डोक्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी टणक वस्तूने जोरदार प्रहार करून त्याला जागीच ठार केले. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास येथील उमरसरा परिसरातील तीन फोटो चौकात घडली. याप्रकरणी चार संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. मात्र घटनेचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. प्रवीण ऊर्फ पऱ्या शामराव वानखडे (२१) रा. गौळपेंड, ता. दारव्हा असे मृताचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो येथील उमरसरा परिसरातील गोवर्धन ले-आऊटमध्ये आई ललिता वानखडे यांच्यासह वास्तव्याला होता. तसेच तणस विक्रीचा व्यवसाय करीत होता. मंगळवारी रात्री तो तीन फोटो चौकातील एका टपरीसमोरील बाकावर झोपून होता. दरम्यान तेथे अज्ञात तिघे जण आले. यावेळी संधी साधून त्यांनी पऱ्यावर टणक वस्तूने प्रहार केला. त्यामध्ये डोक्याला जबर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यातच पऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ घटनेची माहिती वडगाव रोड पोलिसांना दिली. त्यावरून पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पाठोपाठ उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने, ठाणेदार बाळकृष्ण जाधव, फौजदार केंद्रे, स्थानिक गुन्हे शाखा आदी पथकेही तेथे पोहोचली. यावेळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्यानंतर पऱ्याची आई ललिता वानखडे यांची रितसर तक्रार घेऊन अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध वडगाव रोड पोलिसांनी भादंवि ३०२ कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला. रात्रीच पोलिसांनी गोपनीय माहितीवरून मारेकऱ्यांचा शोध घेतला. मात्र थांगपत्ता लागला नाही. अखेर वडगाव रोड पोलिसांनी चार संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली. मात्र त्यांच्यापैकी कुणीही घटनेची कबुली अथवा माहिती दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मारेकऱ्यांची नावेच पुढे आली नसल्याने पऱ्याचा खुन नेमका कोणत्या कारणावरून झाला हेही अद्याप गुलदस्त्यात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)