शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाने आरक्षणाची हत्या करण्याचा प्रकार

By admin | Updated: July 27, 2014 23:59 IST

अशिक्षित, असंघटित आदिवासींच्या आरक्षणावर अनेकांचा डोळा आहे. ९ आॅगस्ट २०१० मध्ये अलाहाबाद कोर्टाने दिलेल्या निकालात आदिवासी कोण हे स्पष्ट केले आहे. सामाजिक, राजकीय आणि घटनात्मक

पत्रपरिषद : संघटना आंदोलनाच्या पवित्र्यातयवतमाळ : अशिक्षित, असंघटित आदिवासींच्या आरक्षणावर अनेकांचा डोळा आहे. ९ आॅगस्ट २०१० मध्ये अलाहाबाद कोर्टाने दिलेल्या निकालात आदिवासी कोण हे स्पष्ट केले आहे. सामाजिक, राजकीय आणि घटनात्मक पेच निर्माण करण्याचा प्रकार सुरू आहे. आरक्षणाच्या माध्यमातूनच आरक्षणाची हत्या करण्याचा प्रयत्न केले जात आहे, असा आरोप आदिवासी संघटनेच्या नेत्यांनी पत्रपरिषदेत केला.१९४९ मध्ये घटनेत अंतर्भूत केलेल्या बाबींनी आदिवासी कोण हे निश्चित करून कलम तयार करण्यात आले आहे. १९७६ मध्ये आदिवासींच्या आरक्षणाचे क्षेत्रबंधन उठविण्यात आले. धानगड ही ओहराण जातीची उपजमात आहे. त्याचा धनगराशी कुठलाही संबंध नाही, हे अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. त्यापूर्वी १९८१ मध्ये धनगरांकडून करण्यात आलेला दावा चुकीचा असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. आता मात्र राजकीय बाब पुढे आली असून संपूर्ण धनगरच आदिवासी असल्याचे सांगत आहे. धनगरांना आरक्षण देण्यास आदिवासींचा कोणताच विरोध नाही. केवळ आदिवासींचे अधिकार हिरावून धनगरांना आरक्षण देणे चुकीचे आहे. धनगरांना आरक्षण देताना घटनात्मक तरतुदींच्या सूचींचा पूर्णपणे विचार केला पाहिजे. कायदे, न्याय व्यवस्था आणि घटना यापेक्षा शासनाचा जीआर महत्त्वाचा नाही. यापूर्वीच धनगराला व्हीजीएनटी म्हणून साडेतीन टक्के आरक्षण दिले आहे. आता धानगडचे धनगड आणि धनगडचे धनगर असा अर्थ लावून आदिवासींच्या आरक्षणावर अतिक्रमण केले जात आहे. अनुसूचित जाती या संघटित आणि जागरूक असल्याने त्यांच्या वाट्याला जाण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही. या उलट अशिक्षित, असंघटित आदिवासींना आरक्षणासाठी बकरा बनविण्याचे प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. यासाठी तीव्र लढा उभारण्यात येईल, असेही आदिवासी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके, प्रा.माधवराव सरकुंडे, आॅल इंडिया एम्पलॉईज फेडरेशनचे गुलाबराव कुडमेथे, सुरेश कन्नाके, आदिवासी विकास परिषदेचे विठोबा मसराम, एम.के. कोडापे, दशरथ मडावी, शंकर कुमरे, हरीश धुर्वे, प्रल्हाद सिडाम, विनोद डवले, सुनील ढोले, किशोर उईके, निनाद सुरपाम, राजू कुडमेथे, अरविंद कुडमेथे उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)