बेवारस बॅगेत आढळले दोन कासव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 06:00 AM2019-12-28T06:00:00+5:302019-12-28T06:00:12+5:30

बसस्थानक परिसरातील वाहतूक नियंत्रक कार्यालयाजवळ एक बॅग गुरुवारी रात्री बेवारस पडून होती. सदर बॅग एका वाहकाला आढळली. त्या बॅगमध्ये एखादी घातक वस्तू किंवा पदार्थ असण्याची शक्यता असल्यामुळे बसस्थानक परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या बेवारस बॅगबाबत संशय आल्याने त्वरित पोलिसांना कळविण्यात आले.

Two tortoise found in a bag | बेवारस बॅगेत आढळले दोन कासव

बेवारस बॅगेत आढळले दोन कासव

Next
ठळक मुद्देदारव्हा येथील घटना : गुप्तधन शोधणारी टोळी सक्रीय

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : येथील बसस्थानकावर गुरुवारी रात्री एक बेवारस बॅग आढळली. या बॅगेत पूजा केलेले दोन कासव आढळले. गुप्तधनासाठी या कासवांची वाहतूक केली जात असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यामुळे तालुक्यात गुप्तधन शोधणारी टोळी सक्रिय असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
येथील बसस्थानक परिसरातील वाहतूक नियंत्रक कार्यालयाजवळ एक बॅग गुरुवारी रात्री बेवारस पडून होती. सदर बॅग एका वाहकाला आढळली. त्या बॅगमध्ये एखादी घातक वस्तू किंवा पदार्थ असण्याची शक्यता असल्यामुळे बसस्थानक परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या बेवारस बॅगबाबत संशय आल्याने त्वरित पोलिसांना कळविण्यात आले. रात्र गस्तीवर असलेले पोलीस पथक त्वरित घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बॅग ताब्यात घेऊन तपासणी केली. त्यात दोन जिवंत कासव आढळले.
यामध्ये एक छोटा व मोठा कासव होता. या दोन्ही कासवांची पूजा केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या पाठीवर स्वस्तिकचे चिन्ह दिसून आले. त्यामुळे गुप्तधन शोधण्यासाठी या कासवांना पकडून आणले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु या कासवांना बेवारस स्थितीत बसस्थानकावर का सोडले असावे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे तालुक्यात गुप्तधन शोधणारी टोळी सक्रिय असल्याचे दिसून येते. दरम्यान, पोलिसांनी या कासवांना वन विभागाच्या सुपूर्द केले. दोनही कासवांना लगतच्या तलावात सोडून दिल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे यांनी सांगितले. सदर प्रकरणाची पोलीस आणि वन विभाग चौकशी करीत आहे.

Web Title: Two tortoise found in a bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.