पांढरकवडा लुटमारीत आणखी दोघे ताब्यात

By Admin | Updated: August 23, 2014 02:10 IST2014-08-23T02:10:12+5:302014-08-23T02:10:12+5:30

महाराष्ट्र- तेलंगाणा सीमेवरील पिंपळखुटी तपासणी नाक्याचे ५ लाख ६५ हजार रुपये लुटल्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी आणखी दोन जणांना ताब्यात घेतले.

Two more robbers in the white racket | पांढरकवडा लुटमारीत आणखी दोघे ताब्यात

पांढरकवडा लुटमारीत आणखी दोघे ताब्यात

पांढरकवडा : महाराष्ट्र- तेलंगाणा सीमेवरील पिंपळखुटी तपासणी नाक्याचे ५ लाख ६५ हजार रुपये लुटल्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी आणखी दोन जणांना ताब्यात घेतले.
भारत तोडासे आणि सनी राठोड रा. जोडमोहा अशी यांची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खर्चात वाढ झाली होती. ढाब्यावर व अन्य ठिकाणी ते सतत पाचशे-हजारच्या नोटा काढत होते. संशय आल्याने ही बाब बीट जमादारापर्यंत पोहोचली. जमादाराने याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला दिली. त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुज्जलवार, निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक महेश तोगडवार यांनी तपास चक्रे फिरविली. त्यांनी जोडमोहा येथून भारत व सनी या दोघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांनी लुटमारीच्या या घटनेची कबुली दिल्याचे आणि त्यांच्याकडून काही रक्कमही जप्त झाल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेने हे दोनही आरोपी पांढरकवडा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
या प्रकरणात घटनेची माहिती देणाऱ्या तथा लुटारूंच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. नवे दोन आरोपी ताब्यात घेतल्याने या अटकेतील युवकाचा खरोखरच या गुन्ह्यात कितपत सहभाग आहे, याचा तपास पांढरकवडा ठाणेदार बागुल करीत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर पांढरकवडा तालुक्यात लुटमारीच्या घटनांत अलीकडच्या काळात वाढ झाली असून यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Two more robbers in the white racket