शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 06:00 IST

रात्रीची वेळ असल्याने अपघातग्रस्ताना मदत मिळण्यास विलंब झाला. जखमी गाडीच्या काचा फोडून बाहेर निघाले. मात्र उर्वरित दोघांना मदत न मिळाल्यामुळे त्यांचा तडफडून जागीच मृत्यू झाला. सकाळी ५ वाजता पांढरकवडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना आदिलाबाद येथे रवाना केले.

ठळक मुद्देदोघे जखमी : राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्याने चालकाचे सुटले नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कपाटणबोरी : नागपूरहून हैदराबादकडे सुसाट वेगाने निघालेल्या जॅग्वार गाडीला पिंपळखुटीनजीक राष्ट्रीय महामार्गावर अपघात होऊन त्यात दोनजण जागीच ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरूवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास पिंपळखुटी रेल्वे पुलाजवळ घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून रस्त्याच्या बाजुला २० फूट खोल असलेल्या शेतात फेकले गेले.योगेश गुप्ता (३७) रा.चप्पलबाजार हैद्राबाद (तेलंगणा), पटाली किशोरकुमार क्रिष्णाचार्य (३६) रा.चारमिनार, सिटीकॉलेजजवळ हैद्राबाद अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये चालक विकास अग्रवाल (४०) व योगेश अग्रवाल (३५) दोघेही रा.हैद्राबाद यांचा समावेश आहे. हे सर्वजण नागपुरहून (टी.एस.१२-इ.सी.९७१९) क्रमांकाच्या जॅग्वार कारने हैद्राबादकडे जात होते. दरम्यान, पिंपळखुटीजवळ असलेल्या एका खड्ड्यात वाहन आदळल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व ही कार ५०० मीटर दूर रस्त्याच्या बाजुला जाऊन आदळली. चालक व त्याच्या बाजुला बसलेला युवक सीटबेल्ट लावून असल्यामुळे त्यांना किरकोळ मार लागला. मात्र मागील सीटवर बसून असलेल्या योगेश गुप्ता व पटाली क्रिष्णाचार्य या दोघांचाही मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने अपघातग्रस्ताना मदत मिळण्यास विलंब झाला. जखमी गाडीच्या काचा फोडून बाहेर निघाले. मात्र उर्वरित दोघांना मदत न मिळाल्यामुळे त्यांचा तडफडून जागीच मृत्यू झाला. सकाळी ५ वाजता पांढरकवडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना आदिलाबाद येथे रवाना केले. एपीआय विनोद झळके, जमादार रंगलाल पवार, क्षीरसागर, चव्हाण, उघडे यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. राष्ट्रीय महामार्गावर अजुनही काही ठिकाणचे काम बाकी असून येथील केवळ २० फुटाचे काम बाकी आहे. या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत असूनही राजपथ कंपनी सदर रस्त्याचे काम का करित नाही, असा सवाल पिंपळखुटीवासींयानी उपस्थित केला आहे. दरम्यान, गुरूवारी सकाळी संतप्त गावकऱ्यांनी काही काळ रस्ता रोखून ठेवला होता. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :Accidentअपघात