आदिवासी आरक्षणाला धक्का नाही

By Admin | Updated: October 3, 2015 02:18 IST2015-10-03T02:18:46+5:302015-10-03T02:18:46+5:30

आदिवासींच्या मूळ आरक्षणास धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत शासनाला पत्र दिले आहे.

Tribal reservation is not shocking | आदिवासी आरक्षणाला धक्का नाही

आदिवासी आरक्षणाला धक्का नाही

आश्वासन : आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे निवेदन
यवतमाळ : आदिवासींच्या मूळ आरक्षणास धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत शासनाला पत्र दिले आहे. आदिवासींचे आरक्षण जसेच्या तसेच राहील, असे आश्वासन माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले.
येथील विश्रामगृहावर या शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन समाजाचे प्रश्न विशेषत: आरक्षण या मुद्यावर चर्चा केली. धनगर आणि तत्सम जातीला आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यात येणार नसल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केल्याचे कळविले आहे.
निवेदन देताना आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव कुडमेथे, जिल्हा सुरेश कन्नाके, शंकरराव कुमरे, प्रमोद घोडाम, रवींद्र कंगाले, प्रा. हरिश धुर्वे, रामभाऊ तोडासे, शंकर कोटनाके, बाबाराव कुळसंगे, गजानन कोटनाके, राजू कुडमेथे, प्रल्हाद सिडाम, पुरुषोत्तम मडावी, विजय गेडाम, राजू मडावी, बिरसा सेनेचे राजू राजगडकर, संतोष मसराम, शंकर युवनाते आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Tribal reservation is not shocking