शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.च्या आणखी ४५ संपकरी कर्मचाऱ्यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 05:00 IST

महिनाभरापासून परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, तर या संपाला चिघळविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारनेेेेही सुरूच आहे. याच कारणाने परिवहन महामंडळाने ४५ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली, तर १९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १२० वर पोहोचली आहे. आतापर्यंत ३०१ कर्मचारी निलंबित झाले आहेत, तर १०४ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परिवहन महामंडळाने बुधवारी ४५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली, तर सलग तिसऱ्या दिवशी १९ एस.टी. बसेस धावल्या. या बसमधून ५०२ प्रवाशांनी बुधवारी प्रवास केला. महिनाभरापासून परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, तर या संपाला चिघळविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारनेेेेही सुरूच आहे. याच कारणाने परिवहन महामंडळाने ४५ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली, तर १९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १२० वर पोहोचली आहे. आतापर्यंत ३०१ कर्मचारी निलंबित झाले आहेत, तर १०४ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली.गत महिनाभरापासून परिवहन महामंडळाच्या एस.टी. बससेस बंद आहेत. कर्मचाऱ्यांंनी पुन्हा कामावर यावे म्हणून परिवहन महामंडळ शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र, यानंतर कर्मचारी संपावर ठाम आहेत. यातील काही कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होत आहे. यातून एस.टी. बसेस सुरू करण्यात आल्या आहे. बुधवारी पांढरकवडा आगारातून ७ बसेस, वणी  ७, यवतमाळ ३ आणि नेरमधून एक एस.टी.बस धावली आहे. या एस.टी. बसमधून ५०२ कर्मचाऱ्यांनी प्रवास केला. कारवाईची ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे. यासोबत एस.टी.च्या बसफेऱ्या वाढविण्यावरही परिवहन महामंडळ काम करणार आहे. येत्या काही दिवसांत एस.टी.चे चित्र आशादायी असणार आहे.

निलंबित चालकाने दुचाकीने पाठलाग करून फोडली एसटी बस 

- नेर : दुचाकीने पाठलाग करत निलंबित चालकाने दगड मारून एसटीच्या काचा फोडल्याचा प्रकार बुधवारी दुपारी ४ वाजता मांगलादेवी येथे घडला. अविनाश मडकाम असे या चालकाचे नाव आहे. नेर आगाराची बस (क्र. एमएच ४० वाय ५७९४) बाभूळगाव येथून नेरकडे परतत असताना डेहणी येथे प्रवासी घेण्यासाठी थांबली. या ठिकाणी अविनाश मडकाम याने बसचे चालक रूपेश  गिऱ्हे, वाहक हरिश राय यांना आगारातून बस कशी काढली, अशी विचारणा केली. तेथून बस नेरकडे निघताच मडकाम याने दुचाकीने पाठलाग केला. मांगलादेवी येथे या बसला दगड मारून काचा फोडल्या. - वणी : पाटणवरून वणीकडे परत येत असलेल्या बसवर मानकीलगत अज्ञात इसमाने दगडफेक केली. यात बसच्या समोरच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. यापूर्वी यवतमाळवरून वणीकडे येणाऱ्या बसवर करंजी येथे दगडफेक करण्यात आली होती. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  परतीच्या प्रवासात मानकीलगत एका अज्ञात इसमाने बसवर दगडफेक केली. यात बसचे १० हजारांचे नुकसान झाले.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप