शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती राज्यमार्गावर वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST

यवतमाळपासून दहा किलोमीटर अंतरावर लासीना गावानजीक दोन दिवसांपूर्वी सिमेंटने भरलेला ट्रक पलटी झाला होता. गुरुवारी सकाळी हा ट्रक क्रेनद्वारे काढण्याचे काम सुरू होते. हा ट्रक व क्रेन रस्त्यात आडवे झाल्याने अमरावती व यवतमाळ या दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली.

ठळक मुद्देविद्यार्थी अडकले : शिक्षक, अपडाऊन करणारे कर्मचारीही उशिरा पोहोचले कार्यालय

लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : यवतमाळ येथून अमरावतीकडे जाणाऱ्या मार्गावर लासीनानजीक सुमारे एक तास वाहतूक ठप्प होती. त्यामुळे अमरावतीला परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी, विद्यापीठात बैठकीला जाणारे शिक्षक आणि अपडाऊन करणारे शासकीय कर्मचारी अडकून पडले होते.यवतमाळपासून दहा किलोमीटर अंतरावर लासीना गावानजीक दोन दिवसांपूर्वी सिमेंटने भरलेला ट्रक पलटी झाला होता. गुरुवारी सकाळी हा ट्रक क्रेनद्वारे काढण्याचे काम सुरू होते. हा ट्रक व क्रेन रस्त्यात आडवे झाल्याने अमरावती व यवतमाळ या दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली. सुमारे एक तास दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.प्रवाशांनी या वाहतूक कोंडीची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. मात्र कुणीही पोलीस पथक घटनास्थळी आले नसल्याची प्रवाशांची ओरड होती. अनेक विद्यार्थ्यांना या वाहतूक कोंडीमुळे अमरावतीच्या परीक्षेला मुकावे लागले. तर बैठकीसाठी जाणारे शिक्षक, शासकीय कर्मचारी यांना विलंबाचा फटका बसला.

टॅग्स :AccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी