अमरावती राज्यमार्गावर वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST2019-09-20T06:00:00+5:302019-09-20T06:00:10+5:30

यवतमाळपासून दहा किलोमीटर अंतरावर लासीना गावानजीक दोन दिवसांपूर्वी सिमेंटने भरलेला ट्रक पलटी झाला होता. गुरुवारी सकाळी हा ट्रक क्रेनद्वारे काढण्याचे काम सुरू होते. हा ट्रक व क्रेन रस्त्यात आडवे झाल्याने अमरावती व यवतमाळ या दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली.

Traffic jam on Amravati state highway | अमरावती राज्यमार्गावर वाहतूक ठप्प

अमरावती राज्यमार्गावर वाहतूक ठप्प

ठळक मुद्देविद्यार्थी अडकले : शिक्षक, अपडाऊन करणारे कर्मचारीही उशिरा पोहोचले कार्यालय

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनखास : यवतमाळ येथून अमरावतीकडे जाणाऱ्या मार्गावर लासीनानजीक सुमारे एक तास वाहतूक ठप्प होती. त्यामुळे अमरावतीला परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी, विद्यापीठात बैठकीला जाणारे शिक्षक आणि अपडाऊन करणारे शासकीय कर्मचारी अडकून पडले होते.
यवतमाळपासून दहा किलोमीटर अंतरावर लासीना गावानजीक दोन दिवसांपूर्वी सिमेंटने भरलेला ट्रक पलटी झाला होता. गुरुवारी सकाळी हा ट्रक क्रेनद्वारे काढण्याचे काम सुरू होते. हा ट्रक व क्रेन रस्त्यात आडवे झाल्याने अमरावती व यवतमाळ या दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली. सुमारे एक तास दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
प्रवाशांनी या वाहतूक कोंडीची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. मात्र कुणीही पोलीस पथक घटनास्थळी आले नसल्याची प्रवाशांची ओरड होती. अनेक विद्यार्थ्यांना या वाहतूक कोंडीमुळे अमरावतीच्या परीक्षेला मुकावे लागले. तर बैठकीसाठी जाणारे शिक्षक, शासकीय कर्मचारी यांना विलंबाचा फटका बसला.

Web Title: Traffic jam on Amravati state highway