शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

टॉवर उभारणीत शासनाला कोट्यवधींचा फटका

By admin | Updated: March 25, 2017 00:25 IST

पावरग्रीडच्या टॉवर उभारणीत वहितीखालील जमीन अकृषक न करता खोदकाम सुरू आहे.

विना परवानगी कामे : पिकांचे नुकसान महागाव : पावरग्रीडच्या टॉवर उभारणीत वहितीखालील जमीन अकृषक न करता खोदकाम सुरू आहे. एका टावर उभारणीत दोन गुंठे जमीन वापरात येत असून वापरात बदल होत असताना महसूल विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. तालुक्यात साधारणपणे शंभरच्या आसपास टॉवर उभारणीचे काम युद्धस्तरावर सुरू असून महसूल मात्र वसूल केला जात नाही. शासनाचे काम असल्याचे सांगून शेतकऱ्यांना धमकाविले जाते. त्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. याबाबतच्या तक्रारी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात केल्या आहेत. चंद्रपूर ते परळी अशी पावरग्रीडच्या टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. एका टॉवरसाठी दोनशे मिटर जमीनीचे क्षेत्र व्यापल्या जात असून बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांची परवानगीसुद्धा घेण्यात आली नाही. उभ्या पिकातच मनमानी पद्धतीने टॉवरचे साहित्य अस्ताव्यस्त टाकले जात आहे. त्यामुळे पिकांसह जमीनीचे नुकसान होत आहे. तक्रारदार शेतकऱ्यांचे तोंड पाहून त्याला नुकसान भरपाई दिल्या गेल्याचे सांगितले जात आहे. पावरग्रीडचे डेप्टी मॅनेजर विनोद सुवर्णकार यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर काम शासनाचे असून या कामाला कोणाच्याही परवानगीची गरज नाही. टॉवर उभारणीत गिट्टी, रेती, मातीचा वापर होत आहे. यासाठी लागणाऱ्या गौण खनिजाची कुठेही रॉयल्टी भरण्यात आली नसल्याची माहीती तहसील कार्यालयाने दिली आहे. अकृषक न करता जमीनीत बद्दल केल्या जात असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आली आहे. काम शासनाचे असो की खासगी शासनाचा महसुल बुडता कामा नये, कुणीही असो कार्यवाही करणार असल्याचे तहसीलदार एन. एल. इसाळकर यांनी सांगितले आहे. (शहर प्रतिनिधी)