शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी दुभाजकावर आदळून तीन तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

योगेश बळवंत नेवारे (३०), महेश अरुण दोनोडे (२८) दोघे रा. मोठे वडगाव, भारत कवडू चौधरी (३५) रा . हिवरी अशी अपघातातील मृतांची नावे आहे. यातील योगेश व महेश हे दोघे वडगावच्या सुभाष क्रीडा मंडळातील कबड्डीचे खेळाडू होते. त्यांची भारत सोबत मैत्री होती. भरत हा एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक होता.

ठळक मुद्देआर्णी मार्गावरील थरार : विरुद्ध दिशेने जात असल्याने अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी: येथील आर्णी मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सोमवारी रात्री मोठे वडगाव परिसरातील तीन तरुण दुचाकीने हिवरीकडे जात होते. दरम्यान अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर दुभाजकावर दुचाकी आदळून हा भीषण अपघात झाला. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.योगेश बळवंत नेवारे (३०), महेश अरुण दोनोडे (२८) दोघे रा. मोठे वडगाव, भारत कवडू चौधरी (३५) रा . हिवरी अशी अपघातातील मृतांची नावे आहे. यातील योगेश व महेश हे दोघे वडगावच्या सुभाष क्रीडा मंडळातील कबड्डीचे खेळाडू होते. त्यांची भारत सोबत मैत्री होती. भरत हा एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक होता. सोमवारी रात्री भरतला हिवरी येथे सोडण्यासाठी योगेश व महेश दुचाकीने निघाले. योगेशच्या दुचाकीवर तिघेजण बसून हिवरीकडे जात होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे बऱ्याचदा रस्ता कधी एका बाजूने बंद केला जातो. यातच या युवकांची फसगत झाली. रस्ता बंद असल्याचे समजून ते विरुद्ध दिशेने हिवरीकडे निघाले. अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर दुभाजकाला जोरदार दुचाकीची धडक बसली. यात तिघेही रस्त्यावर आदळले. डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्राव होऊन तिघांचा मृत्यू झाला.ही घटना रात्री ११ वाजता दरम्यान माहीत झाली. मात्र तोपर्यंत या तिघांपैकी एकही जण जीवंत नव्हता. त्यांना ग्रामीण पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदन गृहात मृतदेह ठेवण्यात आले. सकाळी तिघांचेही शवविच्छेदन झाले. या घटनेने मोठे वडगाव परिसरात एकच शोककळा पसरली. कबड्डीचे खेळाडू अचानक गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.बराच वेळ घटनास्थळावर पडूनअपघात झाल्यानंतर तिघेही बराच वेळ घटनास्थळावर पडून होते. किन्हीजवळ एका व्यक्तीचा रानडुक्कर आडवा आल्याने अपघात झाला. त्याला घेऊन किन्हीतील नागरिक यवतमाळकडे येत असताना त्यांना भीषण अपघाताचे दृश्य दिसले. त्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळावर मदत पोहोचली. तोपर्यंत उशीर झाला होता.

टॅग्स :Accidentअपघात