शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

परजिल्ह्यात अडकलेल्यांचे वणीत आगमन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST

पुण्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता, खबरदारी म्हणून वणी-यवतमाळ मार्गावरील परसोडा येथे उघडण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य तपासणी केली जात आहे. ज्यांच्या आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत, अशांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना पुढील १४ दिवस घरातच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

ठळक मुद्देकाळजी वाढली : होम क्वारंटाईन बंधनकारक, परसोडात केली जात आहे वैद्यकीय तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : राज्यातील विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांचे ७ मेपासून वणी शहरात आगमन सुरू झाले आहे. गेल्या आठ दिवसात गुरूवारपर्यंत ३४१ जण वणीत पोहोचले असून त्यात बहुतांश लोक हे कोरोनाचा उद्रेक असलेल्या पुण्यातून आले आहेत. त्यामुळे वणी शहराची काळजी वाढली आहे.पुण्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता, खबरदारी म्हणून वणी-यवतमाळ मार्गावरील परसोडा येथे उघडण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य तपासणी केली जात आहे. ज्यांच्या आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत, अशांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना पुढील १४ दिवस घरातच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अखेरपर्यंत बाहेरून येणाऱ्यांची संख्या दीड हजारांपेक्षा अधिक असण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. या सर्वांनाच होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यातच आता ही संख्या लक्षात घेता, या सर्वांवर ‘वॉच’ ठेवण्याची मोठी जबाबदारी प्रशासनावर येऊन ठेपली आहे.सुदैवाने आतापर्यंत परजिल्ह्यातून वणीत आलेल्या कुणातही आजाराची लक्षणे आढळली नाहीत. विशेष म्हणजे आपापल्या गावी जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर निघण्यापूर्वी या सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांना फिटनेस सर्टीफिकेट त्या-त्या ठिकाणाहून देण्यात आले आहे. मात्र कोरोनाची लक्षणे अनेक दिवसानंतर दिसून येत असल्याने या सर्वांना होम क्वारंटाईन सक्तीचे करणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर अनेकजण लॉकडाऊनपूर्वी वणीत परतले होते. अनेकांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्केदेखिल होते. मात्र त्यातील अनेकजण मुक्तपणे बाहेर फिरत होते. अशाच एकावर वणी पोलिसांनी गुन्हादेखील दाखल केला होता.प्रशासनापुढे निर्माण झाल्या अनेक अडचणीलॉकडाऊनमुळे शेकडो लोक परजिल्ह्यात अडकून होते. परंतु अलिकडेच त्यांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार अडकून पडलेले हे लोक हळूहळू वणी शहरात पोहोचत आहे. मात्र हे लोक ज्या परिसरात राहतात, त्या परिसरातील नागरिक मात्र दहशतीत आहे. त्यामुळे प्रशासनापुढील अडचणी वाढल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या