परजिल्ह्यातून आलेल्या १६ हजार नागरिकांवर पाळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST2020-03-30T06:00:00+5:302020-03-30T06:00:38+5:30

संघर्ष उद्भवणाऱ्या भागांत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असताना बाहेर ठिकाणी गेलेले जिल्ह्यातील नागरिक जिल्ह्यात परत येणार कसे, असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण झाला आहे. प्रत्येक जण आपले गाव जवळ करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यातून परजिल्ह्यात गेलेले १६ हजार ३३६ नागरिक परत आले आहेत.

They followed the 16,000 citizens who came from the district | परजिल्ह्यातून आलेल्या १६ हजार नागरिकांवर पाळत

परजिल्ह्यातून आलेल्या १६ हजार नागरिकांवर पाळत

ठळक मुद्देडॉक्टरांना खबरदारीच्या सूचना : १४ दिवस आरोग्य तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील कोरोनाचे तिन्ही रुग्ण बरे झाले असले, तरी कोरोना संसर्गाचा धोका पूर्णत: टळलेला नाही. या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून आलेल्या १६ हजार नागरिकांवर पाळत ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिल्या आहे. आरोग्य विभागाचे पथक या नागरिकांची १४ दिवस तपासणी करीत आहे. संघर्ष उद्भवणाऱ्या भागांत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन असताना बाहेर ठिकाणी गेलेले जिल्ह्यातील नागरिक जिल्ह्यात परत येणार कसे, असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण झाला आहे. प्रत्येक जण आपले गाव जवळ करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यातून परजिल्ह्यात गेलेले १६ हजार ३३६ नागरिक परत आले आहेत.
मुंबई, पुणे या शहरांसह गुजरात राज्यातून हे नागरिक परत आले आहेत. बाहेर जिल्ह्यातून आलेल्या भागात कोरोनाचे रूग्ण जास्त होते. यामुळे बाहेर जिल्ह्यातून आलेले व्यक्ती बाधीत असल्या तर स्थानिकांनाही संसर्गाचा मोठा धोका आहे.

५५० कुटुंबांचे अर्ज
बाहेर जिल्ह्यातून स्वगृही आणि यवतमाळातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ५५० नागरिकांनी नागरी सुविधा समितीकडे अर्ज सादर केले आहे. दररोज या अर्जांमध्ये वाढ होत आहे. मात्र यावर तूर्त तोडगा निघालेला नाही.

केळापूर शाळेत आसरा
पिंपळखुटीत थांबविलेल्या परप्रांतीय नागरिकांना केळापूरच्या शाळेत ठेवण्याच्या सूचना आहेत. तर यवतमाळात खोळंबलेल्या १६ नागरिकांना आर्य वैश समाज मंदिरात निवासाची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

Web Title: They followed the 16,000 citizens who came from the district