शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडील कापसाचे सर्वेक्षण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST

तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे आपला कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे, अशा शेतकऱ्यांच्या घरी जावून अथवा ज्या ठिकाणी कापूस आहे त्याठिकाणी जावून नोंदणी केलेला कापूस उपलब्ध आहे काय, आदी बाबींचे सर्वेक्षण होणार आहे. बाजार समितीने नोंदविलेल्या यादीनुसार त्या-त्या गावात जावून कापसाचा साठा उपलब्ध असल्याचे सर्वेक्षण होईल.

ठळक मुद्देबाजार समितीमध्ये नोंदणी झालेल्यांची तपासणी, याद्या घेऊन फिरणार प्रतिनिधी

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात कापूस विक्रीकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडे कापूस साठ्याचे शासकीय यंत्रणेकडून सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीतील सूचनेनुसार हे सर्वेक्षण होणार आहे.तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे आपला कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे, अशा शेतकऱ्यांच्या घरी जावून अथवा ज्या ठिकाणी कापूस आहे त्याठिकाणी जावून नोंदणी केलेला कापूस उपलब्ध आहे काय, आदी बाबींचे सर्वेक्षण होणार आहे. बाजार समितीने नोंदविलेल्या यादीनुसार त्या-त्या गावात जावून कापसाचा साठा उपलब्ध असल्याचे सर्वेक्षण होईल.कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी, गटसचिव किंवा सहायक निबंधक कार्यालयातील कर्मचारी सर्वेक्षण करतील. पंचनाम्यावर सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, कृषी सहायक यापैकी एकाची सही घेतली जाणार आहे. तसे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी तालुका सहायक निबंधकांना दिले आहे.पंचनाम्यावर सहायक निबंधकांनी व्यक्तीश: एकत्रितपणे सदर सर्वेक्षणानुसार संबंधित शेतकऱ्याला आपला कापूस बाजार समिती अथवा जिनामध्ये नेण्याकरिता नियोजन करण्याचे सूचित करण्यात आले आहे. बाजार समितीमार्फत जिनिंगला वाहने पाठविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. या सर्वेक्षणामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. कापूस घरी शिल्लक नसतानाही नोंदी करून सीसीआयला विकू पाहणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहे.कापूस घरात पडूनअनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. नोंदणी झालेली असतानाही खरेदी होत नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे आता बाजार समितीचे प्रतिनिधी तपासणी करणार असल्याने शेतकऱ्यांना स्वत:च्याच मालाविषयी उत्तरे द्यावी लागणार आहे. कापूस खरेदीची गती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशी अपेक्षा शेतकºयांना आहे.नोंदणी झालेल्या याद्या निबंधकांकडेबाजार समितीकडे नोंदणी झालेल्या याद्या सहायक निबंधकांनी त्यांच्या ताब्यात घेवून नियोजनाच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे. एकाच व्यक्तीचे नाव अनेकदा यादीमध्ये असल्यास छाननी करून एकच नाव ठेवण्यात यावे, इतर नोंदी रद्द कराव्या, असे आदेशात सुचविले आहे. यामुळे शेतकºयांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

टॅग्स :cottonकापूसcorona virusकोरोना वायरस बातम्या