शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भंगारच्या दुकानातून लागला दुचाकी चोरीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 05:00 IST

सद्दाम रफिक बैलीम (३२, रा. दत्तनगर आर्णी), राजीक रफिक शेख (१९, रा. देऊरवाडा पुनर्वसन) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांच्या गॅरेजमध्ये दुचाकीचे भाग सुटे केले जात असल्याची गोपनीय माहिती आर्णी पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडार, मनोज चव्हाण, अक्षय ठाकरे, मिथुन जाधव यांनी या संपूर्ण प्रकरणाची आणखी माहिती मिळविणे सुरू केले.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत. दुचाकी तर सर्रासच चोरीला जात आहेत. दिवसाला किमान १० ते १५ घटना दुचाकी चोरीच्या होत आहेत. आतापर्यंत दुचाकी चोरट्यांचा माग पोलिसांना काढता आला नव्हता. आर्णी पोलिसांनी एका गोपनीय माहितीची शहानिशा केली. त्यातून धक्कादायक प्रकार पुढे आला. शहरातील एका भंगारच्या दुकानात दुचाकीचे सुटे भाग केले जात असल्याची माहिती मिळाली. यातून चोरीचे रॅकेट पुढे आले.सद्दाम रफिक बैलीम (३२, रा. दत्तनगर आर्णी), राजीक रफिक शेख (१९, रा. देऊरवाडा पुनर्वसन) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांच्या गॅरेजमध्ये दुचाकीचे भाग सुटे केले जात असल्याची गोपनीय माहिती आर्णी पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडार, मनोज चव्हाण, अक्षय ठाकरे, मिथुन जाधव यांनी या संपूर्ण प्रकरणाची आणखी माहिती मिळविणे सुरू केले.शहरातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या सद्दाम मोटर गॅरेजमध्ये दुचाकीचे भाग सुटे केले जातात, अशी पोलिसांची खात्री झाली. त्यानंतर शिताफीने पोलीस पथकाने हे गॅरेज गाठले. त्यावेळी दोन्ही आरोपी हिरो कंपनीच्या स्प्लेंडर कंपनीचे भाग वेगळे करत होते. पोलिसांना या दुचाकीची नंबरप्लेट (एमएच २९, बीएस ९८९१) असल्याचे आढळले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करत सुटे भाग असलेला मुद्देमाल ताब्यात घेतला. नंतर ही दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.

दारव्हा पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात- दारव्हा शहरातून चोरी गेलेली दुचाकी आर्णीत एका गॅरेजमध्ये सुटे भाग केले जात असताना सापडली. त्यामुळे दोन्ही आरोपींना दारव्हा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याचा तपास सुरू आहे. - सातत्याने शहरात व ग्रामीण भागातून दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. शहरातून चोरी गेलेल्या दुचाकी अतिशय कमी दरात विकल्या जातात. त्याची अधिक रक्कम व्हावी यासाठी काही जण तिचे सुटे भाग करतात.- भंगारमध्ये सुट्या भागाला चांगली किंमत येत असल्याने सध्या चोरीच्या दुचाकींचे सुटे भाग करून विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू आहे. मात्र, अजूनही पोलिसांच्या तपास यंत्रणेचे लक्ष नाही.

 

टॅग्स :PoliceपोलिसThiefचोर