शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या मोटर विभागात शिरला चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 05:00 IST

मोटर वाहन विभागातील चोरीचे सत्र २३ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे. महामहीम राज्यपाल जिल्हा दौऱ्यावर असताना वाहनांचा ताफा तयार करण्यात आला. त्यावेळी आलेल्या वाहनांच्या बॅटऱ्या लंपास झाल्या. यामध्ये एमएच-२९-एन-९०८८, ९०९५, ९५१७, ९६३८, एमएच-३७ए-४१६७, एमएच-२९-९१३० या वाहनांच्या बॅटरीज चोरीस गेल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चोरट्यांनी आता कुठलीही जागा सुरक्षित ठेवलेली नाही. पोलीस मुख्यालय हे जिल्हा पोलीस दलाचा गड मानला जातो. त्या ठिकाणी असलेल्या मोटर वाहन विभागात चोरट्यांनी धुडगूस घातला. तब्बल सात वाहनांच्या ५७ हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या चोरट्याने लंपास केल्या. मोटर वाहन विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी मंगळवारी या चोरीच्या घटनेची अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मोटर वाहन विभागातील चोरीचे सत्र २३ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे. महामहीम राज्यपाल जिल्हा दौऱ्यावर असताना वाहनांचा ताफा तयार करण्यात आला. त्यावेळी आलेल्या वाहनांच्या बॅटऱ्या लंपास झाल्या. यामध्ये एमएच-२९-एन-९०८८, ९०९५, ९५१७, ९६३८, एमएच-३७ए-४१६७, एमएच-२९-९१३० या वाहनांच्या बॅटरीज चोरीस गेल्या आहेत. चोरटे चोख पोलीस बंदोबस्त असणाऱ्या पोलीस मुख्यालयात वारंवार शिरुन तेथे चोरीचा डाव साधतात. आतापर्यंत अनेक वेळा पोलीस मुख्यालयात चोरी झाली आहे. ज्या ठिकाणी जिल्हा पोलीस दलाचा शस्त्रागार आहे, तीच जागा सुरक्षित राहिलेली नाही. यावरून पोलिसांचे चोरट्यांवरील जरब संपुष्टात आल्याचे दिसून येते आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात. 

मुख्यालयातील चोरीचे गुन्हे अनडिटेक्ट- आजतागायत मुख्यालयात झालेल्या चोरीचा एकही गुन्हा उघडकीस आलेला नाही. पोलीस मुख्यालय अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे गुन्हे तपास करण्याची जबाबदारी त्यांची आहे. असे असले तरी यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे शासकीय निवासस्थानही याच ठिकाणी आहे. - त्यानंतरही चोरट्यांचा शोध घेतला जात नाही. ही बाब अतिशय शरमेची आहे; मात्र याचे सोयरसूतक स्थानिक पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना दिसत नाही. स्वत:च्या मुख्यालयाची सुरक्षा पोलीस करू शकत नाही, असाच संदेश यातून जनमाणसात जात आहे. त्यामुळे यापुढे या परिसरात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होत  आहे. 

 

टॅग्स :PoliceपोलिसThiefचोर