शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

बडतर्फ कर्मचारी कामावर परतू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 05:00 IST

आठवडाभरापूर्वी केवळ १२५ बसेसद्वारे जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर प्रवाशांची वाहतूक केली जात होती. आता यामध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात १७६ बसेसच्या माध्यमातून ४४२ फेऱ्या करण्यात आल्या. १२ हजार २८८ नागरिकांनी लोकवाहिनीतून प्रवास केला. आता आणखी कर्मचारी वाढले असल्याने बसफेऱ्यांची संख्या वाढण्यासोबतच प्रवाशांची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होणार आहे. ग्रामीण फेऱ्याही वाढण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपात सहभागी झाल्याने बडतर्फीच्या कारवाईत अडकलेले कामगार कामावर हजर होण्याची गती एकदम वाढली आहे. गेल्या दोन दिवसांत ३८ कर्मचारी कामावर हजर झाले. केवळ सक्त ताकीद देऊन त्यांना कामावर घेण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक वाहक आणि चालकांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मागील पाच महिन्यांपासून संप सुरू केला आहे. दरम्यानच्या काळात महामंडळाने या कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले. शिवाय, कारवाईचा बडगाही उगारण्यात आला. यवतमाळ विभागातील ४१७ कामगारांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. यातील काही कर्मचाऱ्यांनी अपील केल्यानंतर त्यांना सक्त ताकीद देऊन कामावर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ४ व ५ मार्च या दोन दिवसांत अनुक्रमे २०, १८ कर्मचाऱ्यांना कामावर घेतले गेले. 

१७६ एसटी बसेसने प्रवाशांची वाहतूक- चालक, वाहक कामावर येण्याची संख्या जसजशी वाढत आहे, तसतशी बसफेऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. आठवडाभरापूर्वी केवळ १२५ बसेसद्वारे जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर प्रवाशांची वाहतूक केली जात होती. आता यामध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात १७६ बसेसच्या माध्यमातून ४४२ फेऱ्या करण्यात आल्या. १२ हजार २८८ नागरिकांनी लोकवाहिनीतून प्रवास केला. आता आणखी कर्मचारी वाढले असल्याने बसफेऱ्यांची संख्या वाढण्यासोबतच प्रवाशांची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होणार आहे. ग्रामीण फेऱ्याही वाढण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करणारबडतर्फीची शिक्षा बाजूला सारून केवळ सक्त ताकीद देऊन कामावर घेण्यात आलेल्या ३८ कर्मचाऱ्यांची कामगिरीवर रुजू होण्यापूर्वी मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. यात पात्र झाल्यानंतरच त्यांना कामावर घेतले जाणार आहे. शिवाय, एक दिवसाचे प्रशिक्षणही त्यांना दिले जाईल.

१७ वाहकांच्या हाती येणार तिकीट मशीनदोन दिवसांत कामगिरीवर येण्यास तयार झालेल्या कामगारांमध्ये सर्वाधिक १७ वाहक आहेत. आवश्यक चाचण्या पूर्ण केल्यानंतर त्यांना कामावर रुजू करून घेतले जाईल. लगेच त्यांच्या हाती तिकिटांचे मशीन दिले जाईल. रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन चालक तथा वाहकाचा समावेश आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप