शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

फेक आयडीवरून मुलानेच मागितली वडिलांकडे खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 05:00 IST

शाळकरी विद्यार्थी असलेल्या मुलाने वडिलांकडून पैसे काढण्यासाठी नवीनच शक्कल लढविली. त्याने फेक आयडी तयार करून फेसबुकच्या माध्यमातून वडिलांना धमकावणे सुरू केले. यासाठी त्याने आकाश गिरोलकर व नंतर विनय टाके ही नावे धारण केली. दोन्ही फेक आयडींचा वापर करीत वारंवार वडिलांनाच धमक्या देणे सुरू केले. इतकेच नव्हेतर, त्याने मुलाचा खून केला जाईल, त्याच्या पोस्टमार्टमची तयारी ठेवा, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : येथील एका व्यावसायिकाने आर्णी पाेलीस ठाणे गाठून मंगळवारी तक्रार दिली. अज्ञात व्यक्तीकडून मुलाचे अपहरण करीत त्याला ठार करण्याची धमकी दिली जात आहे. त्या मोबदल्यात एक लाखाची खंडणी मागितली आहे. आर्णीसारख्या लहानशा गावात खंडणीचा प्रकार घडल्याने पोलिसांनीही कसून शोध घेणे सुरू केले. यात फिर्यादीचा मुलगाच फेक आयडी वापरून वडिलांना धमकावत असल्याचे पुढे आले. शाळकरी विद्यार्थी असलेल्या मुलाने वडिलांकडून पैसे काढण्यासाठी नवीनच शक्कल लढविली. त्याने फेक आयडी तयार करून फेसबुकच्या माध्यमातून वडिलांना धमकावणे सुरू केले. यासाठी त्याने आकाश गिरोलकर व नंतर विनय टाके ही नावे धारण केली. दोन्ही फेक आयडींचा वापर करीत वारंवार वडिलांनाच धमक्या देणे सुरू केले. इतकेच नव्हेतर, त्याने मुलाचा खून केला जाईल, त्याच्या पोस्टमार्टमची तयारी ठेवा, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी गुन्हा नोंद केला होता. 

मुलांच्या मोबाईल वापराने पालक झाले चिंतित - सायबर सेलच्या माध्यमातून या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलिसांनी सुरू केला. यात धक्कादायक वास्तव पुढे आले. इयत्ता दहावीला असलेल्या मुलानेच वडिलांना ब्लॅकमेल करणे सुरू केले. नेमके पैसे कशासाठी मागत होता, याची चौकशी आर्णी पोलीस करीत आहेत. मात्र, या गंभीर प्रकरणानंतर पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शाळकरी मुलांमध्ये मोबाईल व समाज माध्यमांची मोठी क्रेझ आहे. त्याचा वापर अशा पद्धतीने होत असेल तर पालकांनी काय करावे, हा प्रश्न आहे. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस