शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
3
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
4
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
5
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
6
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
7
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
8
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
9
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
10
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
11
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
12
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
13
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
14
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
15
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
16
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
17
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
18
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
19
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
20
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या उपोषणाचा दहावा दिवस

By admin | Updated: November 26, 2014 23:14 IST

पूर्ववत कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी वन प्रकल्प विभागातील कामगारांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा दहावा दिवस उजाडला आहे. या विभागातील ३४ कामगारांना अपात्र ठरविण्यात आले.

यवतमाळ : पूर्ववत कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी वन प्रकल्प विभागातील कामगारांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा दहावा दिवस उजाडला आहे. या विभागातील ३४ कामगारांना अपात्र ठरविण्यात आले.
१६ आॅक्टोबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार वन प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक तसेच व्यवस्थापक संचालक नागपूर यांनीही या कामगारांना नियमित करण्याबाबत कुठलीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे चार कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान काही बाबींवर सकारात्मक तोडगा निघाल्याने सहकुटुंब ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र कामावर घेण्यासाठीचे उपोषण सुरूच असल्याचे राजू मेश्राम यांनी कळविले.
‘नाग’ संघटनेचे निवेदन
वनकामगारांच्या आंदोलनात ‘नाग’ संघटनेने सक्रिय सहभाग नोंदवत वन विकास प्रकल्पाच्या नागपूर व्यवस्थापकीय संचालकांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. उपोषणकर्ते आणि इतर वनकामगार पात्र ठरत असूनही त्यांना सेवेत कायम करण्यास नकार देण्यात आला. ही बाब अन्यायकारक आहे असे या निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद गायकवाड आदी उपस्थित होते.
ट्रेड युनियन कौन्सील
शासन निर्णयानुसार वनकामगारांना नियमित करावे या मागणीसाठी विदर्भ ट्रेड युनियन कौन्सिलतर्फे एफडीसीएम नागपूर आणि वन प्रकल्प विभाग यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले. या कामगारांना न्याय न मिळाल्यास कर्मचारी संघटना आंदोलनात सहभागी होतील, असे कौन्सीलचे सरचिटणीस श्रीराम खिरेकर यांनी म्हटले आहे.