शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशाचे टेंशन

By admin | Updated: May 31, 2015 02:15 IST

बारावीचा निकाल जाहीर झाला. मागील ६८ वर्षातील जिल्ह्याच्या निकालाचे उच्चांक मोडले. या निकालासोबतच काही प्रश्नही निर्माण झाले आहेत.

मिशन अ‍ॅडमिशन : क्षमता केवळ १७ हजार, उत्तीर्ण २२ हजाररूपेश उत्तरवार यवतमाळ बारावीचा निकाल जाहीर झाला. मागील ६८ वर्षातील जिल्ह्याच्या निकालाचे उच्चांक मोडले. या निकालासोबतच काही प्रश्नही निर्माण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाविद्यालयांची प्रवेश क्षमता कमी आहे. गतवर्षी तुकडया वाढवून प्रवेश क्षमता वाढविली. यावर्षी वाढीव तुकड्यांमध्येही विद्यार्थी सामावले जाणार नाही, अशी स्थिती आहे. प्रवेश क्षमता १७ हजार व उत्तीर्ण २२ हजार ६७८ विद्यार्थी यामुळे पाच हजार ६७८ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवेशास मुकावे लागण्याचा धोका आहे. १५ जूनपासून बारावीनंतरच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. प्रक्रिया सुरू होताच काही दिवसात संपूर्ण वर्ग हाऊसफुल्ल होतील. याचे कारणही तसेच आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेपेक्षाही अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे जिल्ह्यात ६७ महाविद्यालये आहेत. यात कला शाखेचे २० महाविद्यालये असून याठिकाणी १२ अतिरिक्त तुकड्या मंजूर करण्यात आल्या. त्यामुळे महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ३८४० झाली. वाणिज्य शाखेच्या पदवी शिक्षणासाठी ३० महाविद्यालये आहेत. याठिकाणी गतवर्षी १२ अतिरिक्त तुकड्या वाढविल्या. यामुळे याठिकाणची प्रवेश क्षमता ३६०० वरून ५०४० वर पोहोचली. विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमासाठी १७ महाविद्यालये आहेत. यात १२ अतिरिक्त तुकड्या वाढल्याने महाविद्यालयांची प्रवेश क्षमता २०४० वरून ३४८० झाली.कला-वाणिज्य-विज्ञान शाखेच्या एकूण १०९२० जागा आहे. जिल्ह्यात २२ ६७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामुळे अर्ध्याअधिक विद्यार्थ्यांना तुकड्या वाढविल्यानंतरही प्रवेश मिळणे अशक्य आहे. यासोबतच बारावीनंतर प्रवेश मिळविण्यासाठी इतर अभ्यासक्रम आहेत. यामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालये, फार्मसी कॉलेज, बीसीए, समाजकार्य, कृषी, डेअरी टेक्नॉलॉजी, लॉ, नर्सिंग आणि डीएडचा पर्याय खुला आहे. याठिकाणी सात हजार ३२० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. यानंतरही पाच हजार ५४८ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा पेच निर्माण होणार आहे. याकरिता विद्यापीठाकडे आणखी अतिरिक्त तुकड्यांची मागणी महाविद्यालयांना करावी लागणार आहे. याला परवानगी मिळाल्यानंतरच प्रवेशाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.