शहर रस्ते दुरुस्तीसाठी ६९ लाखांच्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 06:00 AM2019-12-12T06:00:00+5:302019-12-12T06:00:07+5:30

नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांच्या अध्यक्षतेत स्थायी समितीची सभा झाली. या सभेत शहरातील प्रमुख विकास कामांना मान्यता देण्यात आली. यावेळी सर्व समितीचे सभापती, सदस्य उपस्थित होते. शहरातील प्रभाग-१ ते २८ मधील रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता डांबरी पॅच रिपेअरिंग करण्याच्या निविदा मागविण्यात आल्या. या निविदांना मान्यता देण्यात आली.

Tender of Rs. 69 lakh for repair of city roads | शहर रस्ते दुरुस्तीसाठी ६९ लाखांच्या निविदा

शहर रस्ते दुरुस्तीसाठी ६९ लाखांच्या निविदा

Next
ठळक मुद्देयवतमाळ नगर परिषद : स्थायी समितीच्या सभेत विविध कामांना मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. त्याची डागडुजी करण्यासाठी ६९ लाखांच्या निविदा मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला. यात सर्व निविदांना बुधवारी झालेल्या सभेत मान्यता देण्यात आली.
नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांच्या अध्यक्षतेत स्थायी समितीची सभा झाली. या सभेत शहरातील प्रमुख विकास कामांना मान्यता देण्यात आली. यावेळी सर्व समितीचे सभापती, सदस्य उपस्थित होते. शहरातील प्रभाग-१ ते २८ मधील रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता डांबरी पॅच रिपेअरिंग करण्याच्या निविदा मागविण्यात आल्या. या निविदांना मान्यता देण्यात आली. ६९ लाखांची ही कामे लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्रासाठी पाच कोटींचे अनुदान आले आहे. यातून प्रभाग क्र.२२ मध्ये बिरसा मुंडा आदिवासी सांस्कृतिक भवन बांधले जाणार आहे. त्या निविदा मंजूर केल्या आहे.
प्रभाग क्र.३ मध्ये सार्वजनिक शौचालय व सार्वजनिक नालीचे बांधकाम केले जाणार आहे. प्रभाग क्र.१७ मध्येही संरक्षक भिंत बांधकामाच्या निविदेला मंजुरात देण्यात आली. दलितेतर वस्ती सुधार योजनेतून पिंपळगाव परिसरात डांबरीकरणाच्या निविदांना मान्यता देण्यात आली.
स्वच्छ सर्वेक्षणासाठी चमू शहरात येणार आहे. त्यापूर्वी येथील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. एकूण ४६ शौचालय दुरुस्त केले जाणार आहे. मालमत्ता करात दहा कोटींची वसुली झाली आहे. सहा कोटी कर थकीत आहे. आता बँकेच्या माध्यमातून नागरिकांना कर भरण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यावरही सभेत चर्चा झाली. शहरातील वराह पकडण्यासाठी १०० रुपयांप्रमाणे कंत्राट मंजूर करण्यात आले.

-तर कंत्राटदाराला ब्लॅक लिस्टेड करा
शहरातील बोअरवेल दुरुस्तीसाठी कंत्राट देण्यात आले आहे. मात्र वारंवार सूचना करूनही कंत्राटदाराकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. अनेक बोअरवेल बंद पडल्या आहेत. या तक्रारी सारख्या वाढत आहेत. कंत्राटदार जुमानत नसेल तर त्याला ब्लॅक लिस्टेड करा, असा आदेश नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी दिला.

Web Title: Tender of Rs. 69 lakh for repair of city roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.