शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीवर वर्गात अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला चोपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:00 IST

अरुण राठोड (५५) रा.जवळा हा शिक्षक बेलोरा ता.यवतमाळ येथील जिल्हा परिषद शाळेवर चार वर्षापासून कार्यरत आहे. वर्गातील विद्यार्थिनीसोबत त्याचे गैरवर्तन सुरू असल्याचा संशय ग्रामस्थांना होता. शाळा बंद असल्यानंतरही शिक्षक अतिरिक्त वर्ग घेत होता. बऱ्याचदा रविवारीही हा शिक्षक शाळेतच दिसत होता. शनिवारीसुद्धा दुपारी १.३० वाजता शिक्षक शाळेत असताना ग्रामस्थांनी धडक दिली. तेव्हा त्याचे गैरकृत्य उघड्या डोळ्याने दिसले. ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. शिक्षकाला चांगलाच चोप दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ/मंगरूळ : प्राथमिक शाळेतील ५५ वर्षीय शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीला नादी लावले. सलग दोन वर्षापासून हा प्रकार सुरू होता. ती मुलगी महाविद्यालयात गेल्यानंतरही शिक्षक तिला  क्लासच्या बहाण्याने शाळेत बोलवत होता. याची कुणकुण ग्रामस्थांना लागली. शनिवारी या शिक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. ग्रामस्थांनी त्याला बेदम चोप दिला. शेवटी ग्रामीण पोलिसांनी बळाचा वापर करून शिक्षकाची सुटका केली.अरुण राठोड (५५) रा.जवळा हा शिक्षक बेलोरा ता.यवतमाळ येथील जिल्हा परिषद शाळेवर चार वर्षापासून कार्यरत आहे. वर्गातील विद्यार्थिनीसोबत त्याचे गैरवर्तन सुरू असल्याचा संशय ग्रामस्थांना होता. शाळा बंद असल्यानंतरही शिक्षक अतिरिक्त वर्ग घेत होता. बऱ्याचदा रविवारीही हा शिक्षक शाळेतच दिसत होता. शनिवारीसुद्धा दुपारी १.३० वाजता शिक्षक शाळेत असताना ग्रामस्थांनी धडक दिली. तेव्हा त्याचे गैरकृत्य उघड्या डोळ्याने दिसले. ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. शिक्षकाला चांगलाच चोप दिला. दरम्यान घटनेची माहिती पोलीस पाटलांनी ग्रामीण पोलिसांना दिली. ठाणेदार किशोर जुनगरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार पथकासह बेलोरा येथे पोहोचले. मात्र कृत्यामुळे संतापलेले ग्रामस्थ शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी परिस्थिती ओळखून बळाचा वापर करत अरुण राठोड याची जमावाच्या तावडीतून सुटका केली. विद्यार्थिनीला व   अरुण राठोड याला शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात भेट दिली. पीडित मुलीच्या आई-वडिलांशी त्यांनी चर्चा केली. पीडितेच्या वडिलाच्या तक्रारीवरून कलम ३७६, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविला.

शिक्षकाची दुचाकी पेटवून दिली अरुण राठोड याला शाळेत डांबून ग्रामस्थ चोप देत असल्याची माहिती मिळताच जवळा येथून त्याचा भाऊ बेलोरा येथे पोहाेचला. त्यालाही ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. दरम्यान काही नागरिकांनी अरुण राठोडच्या भावाला तेथून जाण्यास सांगितले. संतप्त जमावाने अरुण राठोडची दुचाकीही पेटवून दिली. काही काळ बेलोरा येथे तणावाचे वातावरण होते.

 

टॅग्स :Teacherशिक्षकPoliceपोलिस