शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

गोदनीत कंत्राटदारांचा धुडगूस

By admin | Updated: September 24, 2014 23:41 IST

शासनाची रॉयल्टी न भरताच खदानींमधून हजारो ब्रास गौण खनिजाचे खुलेआम उत्खनन सुरू आहे. खनिकर्म विभाग, उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाचे कंत्राटदारांशी

महसूलची मिलीभगत : रॉयल्टी बुडवून गौण खनिज उत्खनन यवतमाळ : शासनाची रॉयल्टी न भरताच खदानींमधून हजारो ब्रास गौण खनिजाचे खुलेआम उत्खनन सुरू आहे. खनिकर्म विभाग, उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाचे कंत्राटदारांशी असलेल्या आर्थिक हितसंबंधातून हा बुडवा कारभार सुरू आहे. यवतमाळ तालुक्यात गोदनी ग्रामपंचायत अंतर्गत बायपासवर सर्वाधिक खदानी आहे. त्या खालोखाल भोयर आणि चिचबर्डी या ग्रामपंचायत क्षेत्रात खदानी आहे. या खदानींमधून मुरुम, दगड (डब्बर), बोल्डर आदी गौण खनिज काढले जाते. त्यासाठी शासनाकडून खदानींचा लिलाव केला जातो. वर्षाकाठी रॉयल्टी भरुन किती क्षेत्रातील गौण खनिज काढावे याचे निर्धारण केले जाते. गोदनी परिसरात सुमारे दोन डझन खदानी आहेत. यातील दीड डझन खदानींच्या लिजची मुदत संपली आहे. सन २००९ पासून यापैकी अनेक खदानींच्या परवान्यांचे नूतणीकरणच केले गेले नाही. यासंबंधीचे प्रस्ताव खनिकर्म विभागात पडून आहेत. हेतुपुरस्सर हे प्रस्ताव प्रलंबित ठेऊन प्रक्रियेत असल्याचे दाखविले जाते. त्याआड रॉयल्टी बुडवून महसूल प्रशासनाच्या मुक संमतीने गौण खनिज उत्खनन केले जाते. हा गोरखधंदा गेल्या काही वर्षांपासून गोदनी व अन्य खदानींमध्ये राजरोसपणे सुरू आहे. राजकीय नेते, बिल्डर, कंत्राटदार, व्यापारी यांच्या या खदानी आहेत. शासकीय यंत्रणा त्यांच्या वाट्याला न जाता आपला खिसा भरुन त्यांच्याशी असलेले हितसंबंध शाबूत ठेवतात. या खदानींमध्ये किती क्षमतेचे भूसुरुंग स्फोट करावे याचीही नियमावली आहे. मात्र प्रत्यक्षात त्या पेक्षा किती तरी अधिक क्षमतेचे स्फोट केले जातात. पर्यायाने गोदनी गावातील अनेक घरांना हादरे बसणे जणू नित्याचेच झाले आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत शासनाची फसवणूक सुरू आहे. या अवैध उत्खननात महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल केवळ ‘हप्ता’ म्हणून होत आहे. खनिकर्म विभाग, महसूल विभागाची यंत्रणा यात गुंतलेली आहे. गोदनीच्या तलाठ्यापासून विभागाच्या वरिष्ठापर्यंत सर्वांचाच या उत्खननाला हातभार आहे. ग्रामपंचायतकडूनही या उत्खननाला कधी विरोध होताना दिसत नाही. यावरून गावकऱ्यांचीही व विशेषत: ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाची मूक संमती असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. अवैध उत्खननातील उलाढालीत एसडीओ, तहसीलदार व खनिकर्म अधिकाऱ्यांसह संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी आदींभोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे. गोदनी परिसरातच खासगी खदानीही आहेत. परंतु त्यांच्या परवान्याचे नूतणीकरण ठरल्याप्रमाणे होत असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)