शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या अनागोंदीने अखेर तस्कराचा जामीन

By admin | Updated: September 29, 2014 00:51 IST

राखीव वनातील दोनशेवर परिपक्व सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालवून भीषण कत्तल करण्यात आली. या घटनेला दोन महिने उलटूनही वनविभागाला त्या तस्कराच्या मुसक्या आवळता आल्या नाही.

हिवरी : राखीव वनातील दोनशेवर परिपक्व सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालवून भीषण कत्तल करण्यात आली. या घटनेला दोन महिने उलटूनही वनविभागाला त्या तस्कराच्या मुसक्या आवळता आल्या नाही. त्यातूनच सवड मिळाल्याने तो जामीन मिळविण्यात यशस्वी झाला. सद्यस्थितीत त्याची चौकशीसाठी हिवरी वनपरिक्षेत्र कार्यालयात ये-जा आहे. मात्र हितसंबंध उघड होतील या भितीने प्रचंड गोपनीयता बाळगली जात आहे. यवतमाळ वनविभागातील हिवरी वनपरिक्षेत्रातील मनदेव बिटमधील राखीव वनातील कक्ष क्रमांक ४९७ आणि लगतच्या जंगलात तब्बल दोनशेवर सागवान वृक्षांची कत्तल करण्यात आली. लाखो रुपये किमतीच्या सागवान लाकडांच्या ट्रकव्दारे दोन खेप गेल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने हा प्रकार उजेडात आला. त्यानंतर तस्कर तिसरी खेप नेत असताना ट्रक फसल्याने पुन्हा दूसरी कत्तल उघडकीस आली. या घटनाक्रमाला आजघडीला दोन महिन्यांचा कालावधी उलटला. तस्कराचे नाव, गाव, पत्ता आणि आश्रयस्थाने यांची माहिती असताना वनविभागाने त्याला हूडकून काढले नाही. परिणामी सवड मिळाल्याने सुरूवातीला त्या तस्कराने येथील न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. त्याच्या अर्जावर सुनावनी करताना न्यायालयाने काही अटी आणि शर्ती ठेऊन त्याला जामीन मंजूर केला. तसेच चौकशीसाठी नियमित हिवरी वनपरिक्षेत्र कार्यालयात हजर रहावे असेही त्या आदेशात म्हटले आहे. त्यावरून मुळचा नांदेड येथील संबंधित तस्कर चौकशीसाठी हजर होत आहे. वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी असलेल्या हितसंबंधातून त्याने पहिल्या कत्तलीतील लाकूडसाठा वाहून नेलेला ट्रक कुठे दडवून ठेवला याची माहिती वनाधिकाऱ्यांपुढे उघड केली. त्यातूनच नांदेड येथील मुखेड जवळच्या एका तांड्यावरून ट्रक (क्र. एमएच २६ एडी १०७९) जप्त करण्यात आला. तसेच त्याच्या दोन साथिदारांनाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आले. एरव्ही मोळी पकडली तरी कारवाईचा गवगवा करणारे वनाधिकारी आणि कर्मचारी यावेळी मात्र मुग गिळून गप्प आहेत. ट्रकची जप्ती करूनही त्याची वाच्यता केली जात नाही. वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तस्कराशी असलेले हितसंबंध उघड होतील या भितीने हा प्रकार केला जात असल्याचे खुद्द वनविभागातून सांगण्यात आले. (वार्ताहर)