शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित वाहक चक्क कामगिरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:00 IST

वाहतूक निरीक्षकाचा बेजबाबदारपणा याठिकाणी कारणीभूत ठरला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सारवासारव सुरू झाली. लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांवर याचे खापर फोडण्याची तयारी सुरू आहे. पातुरकर यांनी कामगिरी बजावल्याचे अनेक पुरावे सोडले आहे. लॉगशिट आणि फेरी करून आल्यावर पैशाचा हिशेबही त्यांच्याच नावावर मांडण्यात आला आहे.

ठळक मुद्देएसटीचा यवतमाळ आगार : राळेगावची फेरी केली, बेजबाबदारपणाचा कळस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निलंबित वाहकाला चक्क कामगिरीवर पाठविण्याचा प्रताप एसटीच्या यवतमाळ आगाराने केला. गेली कित्येक वर्षांच्या कालावधीतील हा पहिलाच प्रकार असल्याने एसटीच्या वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.विभागाच्या बेजबाबदारपणाची अनेक प्रकरणे पुढे येत असतानाच यवतमाळ आगारात घडलेल्या या प्रकाराने त्यात भर पडली आहे. अमर पातुरकर या वाहकावर ९ मार्च २०२० रोजीच्या आदेशाने (क्र.४९३) निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यानच्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्याने वाहतूक थांबली. नियम पाळून प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविणे सुरू झाले. यात पातुरकरचाही समावेश होता. निलंबित असताना त्यांना २५ मे २०२० रोजी कामावर बोलविण्यात आले, राळेगाव फेरीवरही पाठविले. तोपर्यंत आगार पातळीवरील वरिष्ठांना याची खबरही नव्हती. वाहतूक निरीक्षकाचा बेजबाबदारपणा याठिकाणी कारणीभूत ठरला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सारवासारव सुरू झाली. लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांवर याचे खापर फोडण्याची तयारी सुरू आहे. पातुरकर यांनी कामगिरी बजावल्याचे अनेक पुरावे सोडले आहे. लॉगशिट आणि फेरी करून आल्यावर पैशाचा हिशेबही त्यांच्याच नावावर मांडण्यात आला आहे. यवतमाळ आगारात मर्यादेपेक्षा अधिक संख्येने पर्यवेक्षकांचा वापर आहे. तरीही होत असलेल्या चुका बेजबाबदारपणाचा कळस गाठणाऱ्या आहे. विभागनियंत्रक शिस्तप्रिय आणि कर्तव्यतत्पर आहे. त्यामुळे सदर प्रकरणात कारवाई होईल, असे कर्मचारी वर्गातून ठामपणे सांगितले जात आहे.प्रकरण दडपण्याचा प्रयत्ननिलंबित कर्मचाऱ्याला कामगिरीवर पाठविण्याचे प्रकरण आगार पातळीवर दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाहतूक निरीक्षकाकडून झालेल्या चुकीबद्दल सामान्य कामगाराला अडकवण्याचे प्रयत्न केले जात आहे. संबंधित वाहकाचे निलंबन त्याने केलेल्या कामगिरीच्या दिवसापासून उठविण्याचे यावे आणि वाहतूक निरीक्षकावर कारवाई करण्यात मागणी संघटनेतर्फे एसटी प्रशासनाकडे करण्यात आली आहे, असे एसटी कामगार संघटनेचे यवतमाळ विभागीय सचिव राहुल धार्मिक यांनी कळविले आहे.

टॅग्स :state transportएसटी