शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

होम क्वारंटाईन इसमाचा पुसदमध्ये शंकास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

रंटाईन व्यक्तीबाबत आरोग्य विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच रुग्णवाहिका तेथे दाखल झाली. परंतु त्यात डॉक्टर नसल्याने पुसदचे एसडीओ डॉ. व्यंकट राठोड चांगलेच संतापले. अखेर डॉक्टर असलेल्या एसडीओंनी स्वत:च सदर व्यक्तीची तपासणी केली. तेव्हा ते मृत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी बीडीओ शिवाजी गवळी, तहसीलदार वैशाख वाहूरवार यांनीही भेटी दिल्या.

ठळक मुद्देयंत्रणेला हादरा : मुंबईहून परतला होता

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्याच्या हुडी गावातील होम क्वारंटाईन असलेल्या ५२ वर्षीय इसमाचा मंगळवारी दुपारी संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. चार दिवसांपूर्वी सदर व्यक्ती पत्नीसह मुंबईहून चार दिवसांपूर्वी हुडी गावात आला होता. तो येहळा शेतशिवारात मुक्कामी होता. या दाम्पत्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का आहे. गावातील लोकांनी त्यांना पुसद येथे आरोग्य तपासणीसाठी जाण्यास सांगितले. हे जोडपे हुडी गावातून सात किलोमीटर दूर पुसदलाही मंगळवारी दुपारी पायदळच दवाखान्यात गेले. तेथून परत गावी जात असताना सायंकाळी लक्ष्मीनगरातील एका दवाखान्याजवळ गेले असता या क्वारंटाईन व्यक्तीला अचानक अस्वस्थ वाटले. ते खाली बसले आणि तेथेच या व्यक्तीचा मृत्यू झाला.डॉक्टरविना आली रुग्णवाहिका, एसडीओ राठोड संतापलेक्वारंटाईन व्यक्तीबाबत आरोग्य विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच रुग्णवाहिका तेथे दाखल झाली. परंतु त्यात डॉक्टर नसल्याने पुसदचे एसडीओ डॉ. व्यंकट राठोड चांगलेच संतापले. अखेर डॉक्टर असलेल्या एसडीओंनी स्वत:च सदर व्यक्तीची तपासणी केली. तेव्हा ते मृत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी बीडीओ शिवाजी गवळी, तहसीलदार वैशाख वाहूरवार यांनीही भेटी दिल्या. आरोग्य विभागाला माहिती देऊनही एकही डॉक्टर लगेच हजर न झाल्याने सुमारे दोन तास मृतदेह रस्त्यावरच पडून होता. वृत्तलिहिस्तोवर कुणीही डॉक्टर पोहोचले नव्हते. या मृतदेहाला कुणीही हात लावायला तयार नाही. त्यासाठी आवश्यक पीपीई किट नगरपरिषदेकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू