शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
8
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
9
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
10
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
11
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
12
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
13
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
14
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
15
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
16
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
17
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
18
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
19
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
20
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीच्या दुर्लक्षाने लाखोंचा ऊस खाक

By admin | Updated: November 30, 2015 02:22 IST

दारव्हा तालुक्यातील वरूड येथील निरंजन कुटे यांच्या शेतात विजेच्या तारांत घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने उसाला आग लागली.

ऊस खाक : दारव्हा तालुक्यातील वरूड येथील निरंजन कुटे यांच्या शेतात विजेच्या तारांत घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने उसाला आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण करीत शेतातील लाखो रुपयांचा ऊस भस्मसात केला. या शेतकऱ्याला भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.वरूड येथील घटना : लोंबकळणाऱ्या तारांच्या स्पार्किंगमुळे लागली आगयवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कारभारामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे. एकीकडे कृषिपंपाला वीज पुरवठा नसल्याने पिके सुकत आहे. तर दुसरीकडे लोंबकळलेल्या वीज तारांमुळे हातातोंडाशी आलेला घासही हिरावल्या जात आहे. दारव्हा तालुक्यातील वरूड येथे कृषिपंपाच्या लोंबकळलेल्या वीज तारांचे स्पार्किंग होऊन उसाला आग लागली. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.वरूड येथील निरंजन काशीनाथ कुटे या शेतकऱ्याने शेतात उसाची लागवड केली. मोठ्या मेहनतीने उसाचे पीक बहरले होते. शुक्रवारी सकाळी अचानक उसाला आग लागल्याचे आढळून आले. पाहता पाहता संपूर्ण ऊसच जळून खाक झाला. लोंबकाळलेली वीज तार तुटून पडल्यामुळे उसाला आग लागली. वीज कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. आधीच वीज कंपनीबाबत असलेला रोष या घटनेनंतर आणखी वाढला आहे. वीज वितरण कंपनीने नुकसान भरून द्यावे, अशी मागणीही या शेतकऱ्याने केली आहे. एकंदरच वीज कंपनीच्या कारभाराबाबत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोष आढळून येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)