पिस्तुलासह कुख्यात देवाला अटक

By Admin | Updated: January 30, 2016 02:40 IST2016-01-30T02:40:58+5:302016-01-30T02:40:58+5:30

शहराच्या गुन्हेगारी विश्वातील कुख्यात देवा पवार याला वडगाव रोड पोलिसांनी देशी बनावटीच्या पिस्तुलासह गुरूवारी रात्री ९.४५ वाजता अटक केली.

Stuck in the infamous God with a pistol | पिस्तुलासह कुख्यात देवाला अटक

पिस्तुलासह कुख्यात देवाला अटक

खुनातील आरोपी : आठवडी बाजार परिसरात अटक
यवतमाळ : शहराच्या गुन्हेगारी विश्वातील कुख्यात देवा पवार याला वडगाव रोड पोलिसांनी देशी बनावटीच्या पिस्तुलासह गुरूवारी रात्री ९.४५ वाजता अटक केली. आठवडी बाजार परिसरात केलेल्या या कारवाईत एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
लोहारा येथील बहुचर्चित आरती इंगोले खुनप्रकरणातील मुख्य आरोपी देविदास उर्फ देवा अमरसिंग पवार (४०) रा. महात्मा फुले सोसायटी, वाघापूर, हा काही दिवसापूर्वी जामीनावर बाहेर आला आहे. त्याच्या हालचालीवर पोलिसांचे बारीक लक्ष होते. गुरूवारी रात्री देवा हा पिस्तुल घेऊन आठवडी बाजार परिसरात फिरत असल्याची माहिती वडगाव रोड ठाण्यातील जमादार विकास खडसे यांना मिळाली. त्यांनी याची सूचना सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते यांना दिली. तातडीने त्यांनी आठवडी बाजार परिसर गाठून देवाला अटक केली. ही कारवाई बबलु चव्हाण, बंडू मेश्राम यांनी केली. देवा जवळचे पिस्तुल पश्चिम बंगाल बनावटीचे असून त्याचा बोअर ५.६ एमएम आहे. यापूर्वीसुध्दा या कर्मचाऱ्यांनी अ‍ॅन्टी गँगसेलमध्ये असताना बंगाली बनावटीचे तीन पिस्तुल पकडले होते. या कारवाईची माहिती मिळातच पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी वडगाव रोड ठाण्याला भेट देऊन कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. आरोपी देवाने हे पिस्तुल कोठून खरेदी केले, याचे राऊंड आहेत काय, याचा तपास सुरू आहे. आरोपीचा न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द करावा, असा अर्जही पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Stuck in the infamous God with a pistol