एसटीच्या महिला वाहकाला मारहाण

By Admin | Updated: October 4, 2014 23:33 IST2014-10-04T23:33:10+5:302014-10-04T23:33:10+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकाला प्रवाशांनी बेदम मारहाण केली. ही घटना तालुक्यातील तोंंडोळी येथील बस थांब्यावर शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. गंभीर अवस्थेत महिला

Strike the female carrier | एसटीच्या महिला वाहकाला मारहाण

एसटीच्या महिला वाहकाला मारहाण

तोंडोळीची घटना : गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल
आर्णी : राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकाला प्रवाशांनी बेदम मारहाण केली. ही घटना तालुक्यातील तोंंडोळी येथील बस थांब्यावर शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. गंभीर अवस्थेत महिला वाहकाला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सत्यभामा रत्नाकर गादेकर (२५) रा. दारव्हा असे जखमी महिला वाहकाचे नाव आहे. दारव्हा आगाराची बस शनिवारी सकाळी १० वाजता तोंडोळी येथील बस थांब्यावर आली. बसमध्ये प्रवाशांची गर्दी होती.
त्यामुळे वाहकाने केवळ शालेय विद्यार्थ्यांनी बसमध्ये बसावे, असे म्हटले. यामुळे थांब्यावर बसची प्रतीक्षा करणारे प्रवासी संतापले. काही कळायच्या आत सत्यभामा गादेकर यांना मारहाण सुरू झाली. या मारहाणीत तिला जबर मार लागला असून श्वास घेण्यास त्रास होत होता. तिला बस चालक देवराव पवार आणि विद्यार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
प्रकृती गंभीर असल्याने तिला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. या प्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अज्ञात प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Strike the female carrier