पांढरकवडा शहरात कंत्राटी सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:00:32+5:30

पांढरकवडा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत कंत्राटी पद्धतीवर एकूण ५१ कामगार काम करित आहे. कंत्राटानुसार रस्ते साफसफाई करणे, नाली सफाई, कचरा, गाळ उचलणे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, मृत जनावरे उचलून विल्हेवाट लावणे, झाडेझुडूपे काढणे, जंतूनाशक, धूर व डास प्रतिबंधक औषधे फवारणी करणे तसेच आलेल्या तक्रारींचे निराकरण करणे, इत्यादी कामे शहरात नियमीतपणे केली जात आहे.

The strike of contract cleaning workers started in Pandharkavada city | पांढरकवडा शहरात कंत्राटी सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू

पांढरकवडा शहरात कंत्राटी सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू

ठळक मुद्देतीन महिन्यांपासून वेतन नाही : पालिका व प्रशासनाविरोधात एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : सध्या भारत देश हा कोरोनासारख्या महामारीसोबत लढत आहे. त्यामुळे वैद्यकीय, पोलीस व नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे सफाई कामगारही जीव मुठीत घेऊन लोकांची सेवा करित आहे. परंतु येथील कंत्राटी सफाई कामगारांना मात्र गेल्या तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नाही. त्यामुळे या कामगारांनी गुरूवारपासून आता कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
पांढरकवडा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत कंत्राटी पद्धतीवर एकूण ५१ कामगार काम करित आहे. कंत्राटानुसार रस्ते साफसफाई करणे, नाली सफाई, कचरा, गाळ उचलणे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, मृत जनावरे उचलून विल्हेवाट लावणे, झाडेझुडूपे काढणे, जंतूनाशक, धूर व डास प्रतिबंधक औषधे फवारणी करणे तसेच आलेल्या तक्रारींचे निराकरण करणे, इत्यादी कामे शहरात नियमीतपणे केली जात आहे. यामुळे शहरात संसर्गजन्य रोगाची साथ पसरण्यास अटकाव होत आहे. या त्यांच्या कार्यासाठी शहरात विविध ठिकाणी त्यांचा सत्कारही करण्यात आला. मात्र दुसरीकडे स्वच्छतेची कामे व्यवस्थित होत नसल्याचे कारण सांगून पैसा असूनदेखिल नगरपरिषद व प्रशासन त्यांचे वेतन देण्यास टाळाटाळ करित आहे. टक्केवारी मिळविण्याच्या तुच्छ भावनेने हा प्रकार घडत असून यात गरिब कामगारांची उपासमार होत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आता कामबंद आंदोलनाला सुरूवात केली आहे.

Web Title: The strike of contract cleaning workers started in Pandharkavada city