शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

नियमांची कठोर अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:00 IST

कोविड लसीकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्या, तसेच प्रशासकीय कामकाजाची गती वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सुरुवातीला त्यांचे जांभोरा येथे आगमन झाले. तेथे महिला बचत गटाने सुरू केलेल्या उद्योगाची त्यांनी पाहणी केली. नंतर लाडखेड प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, तलाठी भवन, बोरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. किन्हीवळगी येथील रेशीम उद्योगाची पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कोरोनाच्या नवीन विषाणूची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.तालुक्यात मॅरेथॉन दौरा केल्यानंतर येथील तहसील कार्यालयात सर्व प्रशासकीय विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ. स्नेहल कनीचे, तहसीलदार सुभाष जाधव, मुख्याधिकारी धीरज गोहाड, बीडिओ राजीव शिंदे, ठाणेदार सुरेश मस्के, तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात, वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता एस.पी. राठोड, सहाय्यक निबंधक बी.जी. जाधव आदीसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. कोविड लसीकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्या, तसेच प्रशासकीय कामकाजाची गती वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सुरुवातीला त्यांचे जांभोरा येथे आगमन झाले. तेथे महिला बचत गटाने सुरू केलेल्या उद्योगाची त्यांनी पाहणी केली. नंतर लाडखेड प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, तलाठी भवन, बोरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. किन्हीवळगी येथील रेशीम उद्योगाची पाहणी केली. उपजिल्हा रुग्णालयात कोरोना तसेच लसीकरणाबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. रुग्णांची विचारपूस केली. नगरपरिषदेच्या घनकचरा जागेची पाहणी केली. नव्याने बांधण्यात येत असल्याने प्रशासकीय भवन स्थळाला भेट देऊन त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीने प्रशासन चार्जजिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी तालुक्यातील अनेक गावे आणि कामांना भेट दिली. कोविडसह इतर प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. या दौऱ्यामुळे प्रशासन चार्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. मधल्या काळात कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने काहीशी शिथिलता मिळाली होती. आता मात्र नियमांच्या पालनासाठी प्रयत्न होईल. लसीकरण वाढेल. मरगळ झटकून प्रशासकीय कामांना गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी