शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुराने यवतमाळात तणाव

By admin | Updated: November 6, 2014 23:03 IST

फेसबुक या सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याने यवतमाळात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकाराचा निषेध करीत शहरातील दुकाने बंद करण्यात आली.

व्यापारपेठ बंद पाडली : दोन एसटी बसवर दगडफेकयवतमाळ : फेसबुक या सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याने यवतमाळात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकाराचा निषेध करीत शहरातील दुकाने बंद करण्यात आली. तर यवतमाळात येणाऱ्या दोन एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. यानंतर शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.महामानवाबद्दल आक्षेपार्ह चित्र आणि मजकूर फेसबूकवर प्रसारित झाले. हा प्रकार यवतमाळात माहीत होताच तरुणांनी तीव्र संताप नोंदविला. स्थानिक पाटीपुऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून तरुणांचा एक जत्था स्टेट बँक चौकात पोहोचला. या ठिकाणी घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच दुकाने बंद करण्याची घोषणा देण्यात आली. त्यामुळे स्टेट बँक चौक, मेन लाईन, सराफा बाजार काही क्षणातच बंद झाला. त्यानंतर तरुणांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी शहर पोलिसात तक्रार नोंदविण्याची सूचना केली. तरुण पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी तक्रार नोंदविली. यावेळी जमलेल्या तरुणांना पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी शांत केले. त्यामुळे जमाव परत गेला. मात्र काही वेळानंतर यवतमाळ-धामणगाव मार्गावर एका बसवर दगडफेक करण्यात आली. बसची तोडफोड झाली. परंतु दगडफेक करणाऱ्यांनी कोणत्याही घोषणा दिल्या नाही. त्यामुळे ही बस कोणी फोडली, याबाबत पोलीस तपास करीत आहे. दुसरी बस नागपूर राज्य मार्गावर फोडण्यात आली. प्रवाशांना खाली उतरविल्यानंतर तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर सायंकाळी पोलीस अधीक्षकांनी शहराची पाहणी केली. शहरात ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र तोडफोडीची घटना वगळता शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र शांतता दिसत होती.समाजामध्ये द्वेष पसरविणाऱ्या या घटनेचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली.मुळात असा प्रकार घडल्यानंतर सर्वांनी शांततेच्या मार्गाने अवलंब करणे गरजेचे आहे. त्यामुळे द्वेष पसरविणाऱ्याचा शोध घेणे सहज सोपे होईल, असे बीएसपीचे निमंत्रक सुनील पुनवटकर, रिपाइंचे जिल्हा प्रवक्ते नवनीत महाजन, बामसेफचे विलास कांबळे, कैलास गोंडाने, संजय बोरकर, अशोक मेश्राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अनेकांनी यावेळी आपला संताप व्यक्त केला. (शहर वार्ताहर)