शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रो फायनान्स कंपन्यांची वसुली थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाउन व जमावबंदीचे आदेश दिले असतानाही मायक्रो फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी जिल्ह्यात दर दिवसाला हजारो महिलांना एकत्रित करून सक्तीची वसुली करीत आहेत. या मायक्रो फायनान्स कंपनीच्या सक्तीमुळे महिला एकत्रित येत आहे

ठळक मुद्देशेकडो महिला एकत्र : मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन व कलम १४४ लागू केली असतानाही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहे. दररोज शेकडो महिलांना एकत्र करून या कंपन्या कर्ज वसुली करत असल्याने या कंपन्यांची वसुली काही काळापुरती थांबविण्याची मागणी मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाउन व जमावबंदीचे आदेश दिले असतानाही मायक्रो फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी जिल्ह्यात दर दिवसाला हजारो महिलांना एकत्रित करून सक्तीची वसुली करीत आहेत. या मायक्रो फायनान्स कंपनीच्या सक्तीमुळे महिला एकत्रित येत आहे. त्यामुळे या रोगाचा प्रसार होऊन विषाणू संसर्गबाधित रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या मायक्रो फायनान्सकडून जिल्ह्यात कलम १४४ चे सर्रास उल्लंघन होत आहे. जिल्ह्यात १४४ कलम लागू असताना व या रोगाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी ग्रामीण भागातील मजूर वर्गाला मजुरी मिळत नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न मजूर वर्गाला पडला आहे. त्यात या मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्मचारी धाकदपट करून सक्तीची वसुली करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला वर्ग प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे दिसून येत आहे. आपण या मायक्रो फायनान्स कंपन्यांना काही काळापुरती वसुली थांबविण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी राजू उंबरकर यांनी केली जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

टॅग्स :Marketबाजार