शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र मुलास ठार मारून विहिरीत फेकले, मद्यपी बापाचे कृत्य

By विलास गावंडे | Updated: January 2, 2023 15:30 IST

दाभा येथील घटना, आरोपीला रात्री अटक

बाभूळगाव (यवतमाळ) : दारूच्या नशेत सात वर्षीय सावत्र मुलास ठार मारून मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना बाभूळगाव तालुक्यातील दाभा (पहूर) येथे रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी मारेकरी बापाला बाभूळगाव पोलिसांनी रात्री अटक केली. देविदास उर्फ देऊ नामदेव कोडापे (३६), असे आरोपीचे नाव आहे. त्याने दुसऱ्या पत्नीचा मुलगा राहुल याला ठार मारले.

आरोपी देविदास उर्फ देऊ नामदेव कोडापे हा यवतमाळ येथे तलावफैल भागात राहात होता. सोबत दुसऱ्या पत्नीचा मुलगा राहुलही राहायचा. रविवारी देविदासचा दारूच्या नशेत पत्नीसोबत वाद झाला. तेथून तो राहुलला घेऊन दाभा येथे असलेल्या घरी गेला. तेथे त्याने राहुल याला काठीने जबर मारहाण केली. गावकऱ्यांनी हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला. यानंतर देविदासने राहुल याला हात पकडून गावाबाहेर नेले.

देविदास एकटाच गावात परतल्याने गावकऱ्यांना संशय आला. विचारणा करूनही त्याने राहुलविषयी काहीही सांगितले नाही. त्यांनी शोधाशोध सुरू केली. या प्रकाराची माहिती बाभूळगाव पोलिसांना देण्यात आली. पोलीस तात्काळ दाभा (पहूर) येथे पोहोचले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने राहुलचा शोध सुरू केला. त्यावेळी त्याचा मृतदेह ठाकरे यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला. याप्रकरणी देऊ कोडापे या निर्दयी बापाला अटक करण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी