शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

घाटंजीत ग्रामसेवक संघटनेचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 5:00 AM

सदर ग्रामसेवकाची बदनामी करण्यात आली. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेने केली. संबंधित ग्रामसेवकाचे मानसिक खच्चीकरण होत आहे. तेथे थेट जनतेतून अनुसूचित जमाती प्रवर्गातील सरपंच निवडून आले. ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी कुणीही नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही. पर्यायाने तेथे ग्रामपंचायत कार्यकारणी अस्तित्वात नाही. तेथे निव्वळ नामधारी सरपंच असून आता शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली.

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : कापशी-कोपरी येथे काही ग्रामस्थांनी ग्रामसेवकाचे पाय धुवून आरती करण्याचा प्रकार घडला. त्याची व्हीडिओ शूटिंग व्हायरल केली. यामुळे ग्रामसेवकाची बदनामी झाली. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी दोन्ही ग्रामसेवक संघटनांनी बीडीओंना दिलेल्या निवेदनातून केली.सदर ग्रामसेवकाची बदनामी करण्यात आली. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेने केली. संबंधित ग्रामसेवकाचे मानसिक खच्चीकरण होत आहे. तेथे थेट जनतेतून अनुसूचित जमाती प्रवर्गातील सरपंच निवडून आले. ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी कुणीही नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही. पर्यायाने तेथे ग्रामपंचायत कार्यकारणी अस्तित्वात नाही. तेथे निव्वळ नामधारी सरपंच असून आता शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली. ‘त्या’ लोकांच्या म्हणण्यानुसार सतत तीन महिने ग्रामसेवक गावात आले नाही. मात्र हे म्हणणे खोटे व चुकीचे असून ग्रामसेवकाने एसबीएम व एलओबीअंतर्गत शौचालयाचे बांधकाम केल्याचा दावा ग्रामसेवक संघटनांनी केला आहे.ग्रामसेवकाने शौचालयाचे फोटोसुद्धा अपलोड केले. रमाई, शबरी, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले. नागरिकांना वेळोवेळी दाखले दिले. त्यामुळे अद्याप सचिवाविरुद्ध एकही तक्रार नाही. सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करुन सॅनीटायझर व मास्कचे वाटप केले. या सर्व योजना ग्रामसेवकाने राबविल्या असताना ग्रामसेवक एकटा व आदिवासी असल्यामुळे काहींनी सदर प्रकरण जाणूनबुजून, बदनामी करण्यासाठी घडवून आणल्याचा आरोप संघटनेने केला. या प्रकरणाची चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाने केली. निवेदन देताना संतोष माहुरे, टार्जन बगाटे, प्रियांक घोडे, गुणवंत विरदंडे, मंगेश कुरहाडकर, डी.डी. मुनेश्वर, पी.एस. हिवराळे, जी.आर. इंगोले, एन.बी. नांदणे, महेश मंचलवार, नरेश गुल्हाने, मुळे, रुपेश रघुवंशी, नंदा कांगणे, सुलोचना गजाम, मिना मिसाळ, एन.डी. ठाकरे, अमोल जंंगमवार, श्रीरामे आदी उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत