शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामाची लगबग सुरू

By admin | Updated: May 20, 2014 23:56 IST

खरीप हंगाम जवळ येऊ लागल्याने शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी पाऊस लवकर येण्याचे संकेत प्राप्त झाल्याने बळीराजाने मशागत पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

वणी : खरीप हंगाम जवळ येऊ लागल्याने शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी पाऊस लवकर येण्याचे संकेत प्राप्त झाल्याने बळीराजाने मशागत पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. सोबतच खत आणि बियाण्यांसाठी त्यांची धावाधाव सुरू झाली आहे. वणी तालुक्यात ९२ हजार ३५८ हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. त्यापैकी जवळपास ६० हजार हेक्टरच्यावर क्षेत्रात खरीपाची पेरणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तालुक्यातील लागवडीयोग्य जमिनीचे क्षेत्रफळ मात्र वर्षागणीक कमी होत आहे. तालुक्यात कोळसा खाणींची संख्या सतत वाढत असल्याने आता लागवडीखालील क्षेत्रात घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पन्नातही फरक पडत आहे. सोबतच उत्पन्नात घटही येत आहे. रस्त्यालगतच्या शेतातील पिकांवर धूळ साचत असल्याने पिकाच्या उतारीत येणारी घट शेतकर्‍यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. यावर्षीचा खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे़ येत्या २४ मे पासून पावसाचे पहिले नक्षत्र रोहिणी सुरू होत आहे. त्यानंतर ७ जूनपासून पावसाचे मुख्य नक्षत्र मृग सुरू होणार आहे. परिणामी येत्या १५-२0 दिवसानंतर खरीप हंगामाची लगबग खर्‍या अर्थाने सुरू होणार आहे़ शेतकरी तूर्तास पूर्व तयारीला लागले आहे़ शेताची नांगरणी, वखरणी करण्यात ते गुंग आहे. तालुक्यात जवळपास २६ हजार शेतकरी शेती कसतात. ते आता लग्नसराईकडे दुर्लक्ष करून नांगरणी, वखरणीची कामे करताना दिसत आहे़ शेतात नांगरणी करून वखरणीसह काशा, काडी, कचरा वेचण्याचे काम सुरू आहे़ शेतीची कामे उरकण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने रात्रीसुध्दा नांगरणी, वखरणी करीत असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकर्‍यांची मशागत आता पूर्णत्वासही गेली आहे. त्यामुळे अशा शेतकर्‍यांनी आता बियाणे, रासायनिक खताची खरेदी करून साठवण करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. यावर्षी कृषी विक्रेत्यांनी यापूर्वी बियाणे व रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्याची साठवणूक केली आहे़ त्यामुळे बियाणे व खतांचा सुकाळ असल्याचे एका कृषी विक्रेत्याने सांगितले़ यावर्षी सोयाबिनचा पेरा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे़ कापसाला शासन उत्पादन खर्चावर आधारित भाव देत नसल्याने कापसाचा पेरा फायदेशीर ठरत नसल्याची शेतकर्‍यांची ओरड आहे़ परिणामी शेतकर्‍यांचा सोयाबीन पेरणीकडे कल वाढला आहे़ कमी खर्चात सोयाबिनचे अधिक उत्पन्न घेता येते. तसेच सिंचनाची सोय असल्यास सोयाबीन पीक काढणीनंतर दुसरे रबी पीकही घेता येते़ त्यामुळे सोयाबीन पीक फायदेशीर असल्याचे शेतकर्‍यांना वाटत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)