शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’ कार्यशाळेतील कर्मचारी असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत कर्मचाऱ्यांची बिनकामाची गर्दी वाढली आहे. ३१ मार्चपर्यंत एसटी बसफेऱ्या बंद ठेवल्या जाणार आहे. या काळात बस दुरुस्तीची कामे निघणारी नाही. तरीही कर्मचाºयांची कार्यशाळेत गर्दी वाढविण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्याचे संदेश आहे. विभागीय कार्यशाळेत मात्र याचे पालन होत नसल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देकोरोनाच्या संसर्गाची भीती : अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडे घेतली धाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत कर्मचाऱ्यांची बिनकामाची गर्दी वाढली आहे. ३१ मार्चपर्यंत एसटी बसफेऱ्या बंद ठेवल्या जाणार आहे. या काळात बस दुरुस्तीची कामे निघणारी नाही. तरीही कर्मचाºयांची कार्यशाळेत गर्दी वाढविण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्याचे संदेश आहे. विभागीय कार्यशाळेत मात्र याचे पालन होत नसल्याचे दिसून येते.या कार्यशाळेतील कर्मचाºयांनी सोमवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी ३१ मार्चपर्यंत कार्यशाळा आणि विभागीय भांडार बंद ठेवावे, अशी मागणी करण्यात आली. या काळात अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.विभागीय कार्यशाळा व भांडारात १०५ कर्मचारी एकत्रित कामे करत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कोणतीही दक्षता याठिकाणी घेतली जात नाही. सुविधाही उपलब्ध होत नाही. शासकीय निर्गमित परिपत्रकांचीही दखल घेतली जात नाही. नागपूर, औरंगाबाद मध्यवर्ती कार्यशाळा एवढेच नव्हे तर वर्धा येथील कार्यशाळा बंद करण्यात आली आहे. याशिवाय कामगारांची गर्दी होणारे खासगी उद्योगही यवतमाळात बंद आहेत.सोमवारी ९० टक्के कर्मचारी कामगिरीवर आहे. कोरोनाची प्रचंड दहशत असताना कर्मचाºयांना कामावर बोलाविण्याचा अट्टहास कशासाठी असा प्रश्न विचारला जात आहे. यावर तोडगा काढावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.विभागीय कार्यशाळा व भांडार विभागातील पी.बी. बोनगीनवार, एस.एन. झोपाटे, व्ही.एम. मिश्रा, आर.व्ही. बिडवे, जे.यू. मिर्झा, एम.एन. शेंडे, ओ.डी. दमकोंडवार, पंजाब ताटेवार, सुनील वानखेडे, सुदाम वनकर, राजेंद्र भांडवलकर आदींनी आपल्या स्वाक्षºयानिशी निवेदन दिले.कार्यशाळेत फुरसतीची कामेविभागीय कार्यशाळेत अपघातामुळे निघालेली बसची कामे, आरटीओ पासिंग, रिकंडिशन वर्क चालते. विभागीय भांडारातून आगाराला साहित्याचा पुरवठा केला जातो. इतर दैनंदिन कामे होत नाही. ही कामे आगार पातळीवर होतात. तरीही कर्मचाºयांना कामावर बोलाविले जात आहे.