शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

भावना गवळी चौथ्यांदा विजयी

By admin | Updated: May 17, 2014 00:29 IST

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांनी सर्व अंदाज मोडित काढीत ९३ हजार ८१६ मताधिक्याने विजय संपादित केला. त्यांना चार लाख ७७ हजार ९0५ मिळाली.

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांनी सर्व अंदाज मोडित काढीत ९३ हजार ८१६ मताधिक्याने विजय संपादित केला. त्यांना चार लाख ७७ हजार ९0५ मिळाली. काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांचा पराभव करीत त्या चौथ्यांदा लोकसभेत पोहोचल्या आहेत. देशात असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या झंझावाताने त्यांच्या मताधिक्यात मोठी भर पडली. शिवाजीराव मोघे यांना तीन लाख ८४ हजार ८९ मते, बसपाचे बळीराम राठोड यांना ४८ हजार ९८१ मते तर मनसेचे राजू पाटील राजे यांना २६ हजार १९४ मते मिळाली.

भावना गवळी यांनी वाशिमच्या होमपीचवर आपले वर्चस्व सिद्ध करीत कारंजा, राळेगाव, दिग्रस, यवतमाळ येथूनही मताधिक्य घेतले. एकमेव पुसद विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळविता आली. २00९ च्या तुलनेत भावना गवळी यांच्या मताधिक्यात वाढ झाली. त्यांनी काँग्रेसचे हरिभाऊ राठोड यांचा पराभव करीत त्यावेळी ५६ हजार ९५१ मतांची आघाडी घेतली होती. या निवडणुकीत आघाडीत मोठी वाढ झाली आहे. देशात सर्वत्र असलेल्या काँग्रेस विरोधी लाटेचाही फायदा भावना गवळी यांना या निवडणुकीत मिळाला. महागाई, बेरोजगारी, अतवृष्टी, गारपीट, भारनियमनामुळे सर्वसामान्य त्रस्त झाला होता. याच स्थितीचा फायदा गवळी यांना मिळाला.

काँग्रेसमध्ये उमेदवारीवरूनच सुरुवातीला स्पर्धा दिसत होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे आपले पूत्र राहुलसाठी आग्रही होते. मात्र ऐनवेळेवर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात समावेश नसलेल्या आणि केळापूर-आर्णी विधानसभेचे नेतृत्व करणार्‍या सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. या उलट भावना गवळी आपली तिकीट पक्की समजून प्रचाराला लागल्या होत्या. त्यांनी गावान्गाव पिंजून काढले. तर मोघे यांना कमी वेळात मतदारापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. या निवडणुकीत नव्यानेच लोकसभेच्या आखाड्यात उतरलेल्या मनसेला प्रभाव पाडता आला नाही. बहुजन समाज पार्टीच्या बळीराम राठोड यांचा हत्ती ५0 हजाराच्या आतच थांबला. या निवडणुकीत सरळ लढत होऊन मतविभागणीत कोणताही उमेदवार महत्वाचा ठरला नाही. परिणामी पुन्हा शिवसेनेच्या गळ्यात विजयाची माळ पडली. (कार्यालय प्रतिनिधी)