नेर तालुक्यात विशेष घटक योजनेचा फज्जा

By Admin | Updated: September 6, 2014 02:24 IST2014-09-06T02:24:54+5:302014-09-06T02:24:54+5:30

मागावर्गीय घटकांकरिता नेर तालुक्यात विशेष घटक योजना राबविण्यात आली. या योजनेत बोगस लाभार्थ्यांचा मोठ्याप्रमाणात भरणा असून, ...

Special component scheme of Ner taluka | नेर तालुक्यात विशेष घटक योजनेचा फज्जा

नेर तालुक्यात विशेष घटक योजनेचा फज्जा

सोनखास : मागावर्गीय घटकांकरिता नेर तालुक्यात विशेष घटक योजना राबविण्यात आली. या योजनेत बोगस लाभार्थ्यांचा मोठ्याप्रमाणात भरणा असून, पात्र आणि ज्ञान नसलेल्या खऱ्या लाभार्थ्यांना मात्र या योजनेतून डावलण्यात आले आहे. त्यासाठी ग्रामसेवकांपासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच मोठ्याप्रमाणात हेरफेर केली असल्याचे सांगण्यात येते.
जीवनमान उंचावण्यासाठी मागासवर्गीय घटकांसाठी शासनाच्या कृषी विभागाकडून विशेष घटक योजनेंतर्गत बैलजोडी आणि बंडी देण्यात येते. ग्रामीण भागाप्रमाणेच तालुक्यातही ही योजना राबविल्या गेली. मात्र चिरीमीरी घेतल्याशिवाय या योजनेचा लाभच मिळत नाही, अशी ओरड आता लाभार्थ्यांकडून होत आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करताना ग्रामसेवक, तलाठी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची भुमिका महत्वाची होती. त्यातूनच या यादीत मोठ्याप्रमाणात घोळ झाला. पात्र लाभार्थ्यांपेक्षा बोगस लाभार्थ्यांचाच त्यामध्ये भरना आहे. लाभार्थी निवडीचे निकष असताना वैयक्तिक स्वार्थापोटी लाभार्थी निवडल्या गेल्याने या योजनेचा तालुक्यात पुरता बोजवारा उडाला आहे.
सोनखास येथील अंबादास जागोजी लडके या लाभार्थ्याने दोनदा बैलजोडी आणि बंडीसाठी आर्थिक सहकार्य मिळावे म्हणून प्रशासनाकडे अर्ज केले. मात्र एकदाही त्यांचा अर्ज विचारात घेतला गेला नाही. याउलट सधन आणि बोगस लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ तत्काळ मिळाला. शिवाय अनेक लाभार्थ्यांना आजवर योजनेतून बैलजोडी देण्यात आली, परंतु बंडीचा अद्याप थांगपत्ता नाही. अनेक लाभार्थी योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवताना दिसतात. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ही योजना शासनाने राबविली. मात्र लालफितशाहीने या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: Special component scheme of Ner taluka