शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचा पेरा कमी होणार

By admin | Updated: May 24, 2014 00:12 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यात सोयाबिनचा पेरा कमी होणार असून कपाशीचा पेरा मात्र वाढणार आहे. कृषी विभागाने खरीपाचे नियोजन पूर्ण केले असून यावर्षी ६२ हजार ७९३ हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार आहे.

वणी : यावर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यात सोयाबिनचा पेरा कमी होणार असून कपाशीचा पेरा मात्र वाढणार आहे. कृषी विभागाने खरीपाचे नियोजन पूर्ण केले असून यावर्षी ६२ हजार ७९३ हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार आहे. खरीपाची लगबग आता सुरू झाली आहे. यावर्षी पाऊस लवकर येण्याचे संकेत असल्याने शेतकर्‍यांनी आता मशागत पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रीत केले. तालुक्यात एकूण ९२ हजार ३१८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ६४ हजार ४२५ हेक्टर क्षेत्र खरीपाच्या लागवडीयोग्य आहे. यावर्षी त्यातील ४६ हजार ३७0 हेक्टरवर कपाशीची पेरणी होण्याची शक्यता आहे. मागीलवर्षी ४२ हजार ३३८ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. यावर्षी त्यात वाढ होणार आहे. मागीलवर्षी ११ हजार ९९७ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी करण्यात आली होती. मात्र यावर्षी सोयाबिनचा पेरा कमी होण्याची शक्यता असून १0 हजार ७९८ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी होण्याची शक्यता आहे. याशिवाय यावर्षी पाच हजार ६00 हेक्टरवर तूर, एक हजार ५0 हेक्टरमध्ये संकरित ज्वारी, तर केवळ २५ हेक्टरवर इतर पिके घेतली जाण्याची शक्यता आहे. तालुका कृषी विभागाने कपाशी बियाण्यांचे प्रत्येकी ४५0 ग्रॅम वजनाचे तब्बल दोन लाख ३१ हजार ८५0 पाकिटे पेरणीसाठी लागणार असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र तब्बल तीन लाख पाकिटे बाजारात उपलब्ध असल्याचे तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड यांनी स्पष्ट केले. मात्र यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असल्याचेही त्यांनी सांगितले. तालुक्याला आठ हजार १00 क्विंटल सोयाबिनचे बियाणे लागणार आहे. प्रत्यक्षात मात्र केवळ चार हजार १00 क्विंटलच बियाणे उपलब्ध असल्याचे त्यांनी कबूल केले. त्यामुळे चार हजार क्विंटल बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांनी आपल्याकडील सोयाबीन बियाण्यांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. कृषी विभाग शेतकर्‍यांना त्यांच्याकडे असलेल्या सोयाबिनची उगवण क्षमता गावातच तपासून देणार आहे. तसेच वेअर हाऊसधून तब्बल ९५0 क्विंटलचे बियाणे उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आहे. तरीही तालुक्यात सोयाबिनच्या किमान दोन हजार ५00 क्विंटल बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. यावर्षी शेतकर्‍यांनी आंतरपिक म्हणून तुरीचा वापर केल्यास हा तुटवडा भरून निघणार आहे. कपाशीच्या प्रत्येक सहा ओळीनंतर शेतकर्‍यांनी दोन ओळी तुरीची पेरणी केल्यास सोयाबीन बियाणे तुटवड्यावर मात करता येऊ शकते. रुंद सरी वाफा पद्धतीने शेतकर्‍यांनी कपाशीची पेरणी केल्यास एका एकरात ३0 किलोऐवजी केवळ कपाशीचे २0 किलोच बियाणे लागणार आहे. त्यामुळे या पद्धतीने कपाशीची परेणी करण्याची गरज आहे. तथापि बहुतांश शेतकरी कपाशीची पेरणी परंपरागत पद्धतीनेच करतात. (कार्यालय प्रतिनिधी)