शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

ज्वारी खरेदीची केंद्रे उघडलीच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 5:00 AM

जिल्ह्यात मक्याचे फार क्षेत्र नाही. ज्वारीची खरेदी केंद्रे ११ मे रोजी सुरू करून १५ जूनपर्यंत ही खरेदी संपविण्याचे आदेश होते. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुसद, दिग्रस, उमरखेड, महागाव, पांढरकवडा, वणी आणि झरी या सात खरेदी केंद्रांना मंजुरी दिली. संबंधित खरेदी-विक्री संघांमध्ये ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची ऑफलाईन नोंदणी केली गेली. मात्र प्रत्यक्ष ज्वारी खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे.

ठळक मुद्देमुदत संपली : आता व्यापाऱ्यांची ज्वारी शेतकऱ्यांच्या नावाने येणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाने शेतकऱ्यांची ज्वारी १५ जूनपर्यंत खरेदी करण्याचे निर्देश दिले होते. परंतु प्रत्यक्षात ही मुदत जावून तीन आठवडे लोटूनही ही खरेदी केंद्रे सुरू झाली नाहीत. त्यामुळे बहुतांश ज्वारी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना विकली. तर काही ज्वारी शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. आता व्यापाऱ्यांची हीच ज्वारी शेतकऱ्यांच्या नावावर शासनाला हमीभावानुसार विकली जाण्याची दाट शक्यता आहे.ज्वारी व मका मार्केटिंग फेडरेशनमार्फत खरेदी केला जातो. खरेदी-विक्री संघ ही फेडरेशनची सबएजंट आहे. जिल्ह्यात मक्याचे फार क्षेत्र नाही. ज्वारीची खरेदी केंद्रे ११ मे रोजी सुरू करून १५ जूनपर्यंत ही खरेदी संपविण्याचे आदेश होते. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुसद, दिग्रस, उमरखेड, महागाव, पांढरकवडा, वणी आणि झरी या सात खरेदी केंद्रांना मंजुरी दिली. संबंधित खरेदी-विक्री संघांमध्ये ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची ऑफलाईन नोंदणी केली गेली. मात्र प्रत्यक्ष ज्वारी खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी युझर आयडी आणि पासवर्ड फेडरेशनने नेमलेली कंपनी तयार करून मार्केटिंग फेडरेशनला पाठविते. परंतु वारंवार पत्र देऊनही हा पासवर्ड व युझर आयडी मिळाला नाही. पर्यायाने मुदत संपूनही ज्वारीची शासकीय खरेदी होऊ शकलेली नाही. संकरित ज्वारीसाठी दोन हजार ५५० रुपये प्रति क्विन्टल हमीभाव जाहीर केला आहे.नोंदणी करूनही ज्वारी खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांच्या घरात माल पडून आहे. पावसाळ्यात हा माल ठेवायला जागा नाही तर दुसरीकडे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पैशाची आवश्यकता आहे. शासकीय खरेदी सुरू होण्याची चिन्हे नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी बाजारात १९०० रुपये दराने ज्वारी विकावी लागत आहे.जागेची अडचण व पैशाची आवश्यकता लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी खासगी व्यापाºयांना आपली ज्वारी विकणे सुरू केले आहे. शेतकऱ्याला प्रति क्विन्टल ५०० ते ६०० रुपये कमी दराने ही ज्वारी विकावी लागत आहे. परंतु शासनाचे खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर हीच ज्वारी शेतकऱ्यांच्या नावाने व्यापारी हमीभावानुसार विकायला आणण्याची शक्यता अधिक आहे.जिल्ह्यात ३० हजार क्ंिवटल ज्वारीचे उत्पादनजिल्ह्यात २५ ते ३० हजार क्ंिवटल ज्वारीचे उत्पादन झाल्याचे सांगितले जात असले तरी मार्केटिंग फेडरेशनने मात्र हा आकडा दहा हजारांच्या घरात असल्याचे म्हटले आहे. त्यातही पांढरकवडा व झरी या तालुक्यात ज्वारीचे अधिक क्षेत्र असल्याचे सांगण्यात आले.सात ज्वारी खरेदी केंद्रे मंजूर आहेत. परंतु पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक असलेला युझर आयडी व पासवर्ड फेडरेशनकडून मिळाला नाही. त्यामुळे अद्याप खरेदी सुरू होऊ शकली नाही. या पासवर्डसाठी पाठपुरावा सुरू आहे.- अर्चना माळवेजिल्हा व्यवस्थापक, मार्केटिंग फेडरेशन, यवतमाळ.

टॅग्स :agricultureशेती