शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

दडून बसलेल्या कुख्यात गुंड बगिराच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारावर वचक निर्माण करण्यासाठी व त्याची गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार गुन्हेगारांची यादी बनवून त्यांच्यावर एमपीडीए, मोक्कासह हद्दपारीची कारवाई केली जात आहे. करण परोपटे खून प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड आशिष ऊर्फ बगिरा दांडेकर (३२) रा. चमेडियानगर याच्यावरही नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : करण परोपटे खून प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड आशिष ऊर्फ बगिरा रमेश दांडेकर हा एमपीडीए कायद्यानुसार कारवाई होऊ नये, यासाठी दारव्हा तालुक्यातील एका खेडेगावात  लपून बसला होता. स्थानिक गुन्हे शाखेसह सायबर सेलच्या पथकाने गुरुवारी त्याच्या मुसक्या आवळल्या असून, एमपीडीए कायद्यांतर्गत त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारावर वचक निर्माण करण्यासाठी व त्याची गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार गुन्हेगारांची यादी बनवून त्यांच्यावर एमपीडीए, मोक्कासह हद्दपारीची कारवाई केली जात आहे. करण परोपटे खून प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड आशिष ऊर्फ बगिरा दांडेकर (३२) रा. चमेडियानगर याच्यावरही नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कारवायांना प्रतिबंध करण्याच्या हेतूने यवतमाळ शहर ठाणेदार नंदकिशोर पंत यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. या प्रस्तावास मंजुरी देत बगिराला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केले होते; परंतु स्थानबद्ध आदेश तामील करता येऊ नये व कायदेशीर अटक टाळण्याच्या हेतूने बगिरा शहरातून फरार होऊन दारव्हा तालुक्यातील एका गावात लपून बसला होता. याची माहिती अपर पोलीस अधीक्षकांना मिळाल्यानंतर बगिराला स्थानबद्ध करण्यासाठी यवतमाळ शहर, स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल अशी विशेष पथके तैनात करण्यात आली होती. या पथकाने दारव्हा तालुक्यातील ग्रामखोपडी येथून बगिराला ताब्यात घेत एमपीडीए कायद्यांतर्गत त्याच्यावर कारवाई करीत त्याची जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. 

वर्षभरात १२ गुन्हेगार स्थानबद्ध- शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी मोक्का, हद्दपारीसह एमपीडीए कारवाईवर पोलीस प्रशासनाने भर दिला आहे. २०२१ या वर्षात अशा १२ गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, इतर गुन्हेगारांवरही कारवाईची प्रक्रियाही सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, नंदकिशोर पंत, सपोनि गणेश वनारे, पोलीस उपनिरीक्षक योगेश रंधे, गजानन डोंगरे, राहुल गोरे, विशाल भगत, कविश पाळेकर, नीलेश राठोड, विनोद राठोड आदींच्या पथकाने बगिराच्या स्थानबद्धतेची मोहीम पार पाडली.

 

टॅग्स :Policeपोलिस