शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

‘कृषी’च्या पंचनाम्यांची संथगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे वळले आहे. समाधानकारक पावसानंतर जिल्हाभर सोयाबीनची लागवड झाली. मात्र प्रत्येक तालुक्यातून सोयाबीनची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी आल्या. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. परिणामी त्यांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले. यानंतर जिल्ह्यातील तब्बल सहा हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे निकृष्ट सोयाबीन बियाण्याच्या तक्रारी केल्या.

ठळक मुद्देसोयाबीनचे निकृष्ट बियाणे : तक्रारींकडे दुर्लक्ष, नुकसान भरपाई नगण्यच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन लागवडीनंतर अनेकांच्या शेतात बियाणे उगवलेच नाही. जिल्ह्यातील तब्बल सहा हजार शेतकऱ्यांनी निकृष्ट बियाण्याबाबत तक्रारी केल्या. हे प्रकरण न्यायालयात जाण्यापूर्वी कृषी संचालकांनी विक्रेते व कंपन्यांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेशही दिले होते. मात्र अद्यापही कृषी विभागाची गती संथच आहे. त्यामुळे कृषी समितीचे सभापती तथा उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांनी संताप व्यक्त केला आहे.जिल्ह्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे वळले आहे. समाधानकारक पावसानंतर जिल्हाभर सोयाबीनची लागवड झाली. मात्र प्रत्येक तालुक्यातून सोयाबीनची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी आल्या. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. परिणामी त्यांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले. यानंतर जिल्ह्यातील तब्बल सहा हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे निकृष्ट सोयाबीन बियाण्याच्या तक्रारी केल्या. जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने याबाबत कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर कृषी संचालकांकडेही पाठपुरावा करण्यात आला.सहा हजारांपैकी चार हजार शेतकऱ्यांच्या शेतात जावून पंचनामे करण्यात आले. त्यापैकी केवळ ९५२ शेतकºयांना तोकडी आर्थिक मदत मिळाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सर्व तालुका कृषी अधिकारी व बियाणे निरीक्षकांना शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित बियाणे कंपनी व विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र एकाही तालुक्यात गुन्हा दाखल झाला नाही. तत्पूर्वी पुणे येथील कृषी संचालकांनीही कारवाईचे आदेश दिले होते. त्याला जिल्ह्यात हरताळ फासण्यात आला. आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया रेंगाळली. मात्र आदेश देऊनही कारवाई न झाल्याने उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांनी संताप व्यक्त करून संबंधितांना धारेवर धरले.बियाणे निरीक्षक ठरले बिनकामाचेकृषी आयुक्त व जिल्हा कृषी अधीक्षकांनी आदेश देवूनही तालुका कृषी अधिकारी व बियाणे निरीक्षकांनी संबंधित कंपनी व विक्रेत्यांवर फौजदारी दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. जिल्ह्यात कुठेच गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. त्यांचे आर्थिक नुकसान झाले. दुबार पेरणीमुळे संकट ओढवले. या प्रकाराबद्दल शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आम्हाला न्याय कधी मिळेल, अशी विचारणा शेतकरी करीत आहे. आता न्यायालयाच्या निकालाकडे त्यांचे लक्ष आहे.तालुका कृषी अधिकारी व बियाणे निरीक्षकांनी फौजदारी कारवाईस टाळाटाळ केली. यामुणे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. याबाबत कृषी विभागाला निर्देश होते. आता न्यायालयाकडे लक्ष आहे.- बाळासाहेब कामारकरउपाध्यक्ष तथा सभापतीकृषी समिती, जिल्हा परिषद यवतमाळ

टॅग्स :agricultureशेती