सहा ग्रामपंचायतींनी घेतला पुसद जिल्हा निर्मितीचा ठराव

By Admin | Updated: October 4, 2015 00:28 IST2015-10-04T00:28:12+5:302015-10-04T00:28:12+5:30

पुसद जिल्हा निर्मितीसाठी पुसद विकास मंचच्यावतीने टिळक स्मारकच्या प्रांगणात सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाच्या दुसऱ्या दिवशी अनेक मान्यवरांनी भेट देऊन

Six Gram Panchayats took the resolution of creation of Pusad district | सहा ग्रामपंचायतींनी घेतला पुसद जिल्हा निर्मितीचा ठराव

सहा ग्रामपंचायतींनी घेतला पुसद जिल्हा निर्मितीचा ठराव

अन्नत्याग सत्याग्रह : अनेकांनी भेट देऊन दिले समर्थन
पुसद : पुसद जिल्हा निर्मितीसाठी पुसद विकास मंचच्यावतीने टिळक स्मारकच्या प्रांगणात सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाच्या दुसऱ्या दिवशी अनेक मान्यवरांनी भेट देऊन आपले समर्थन दिले आहे. तसेच तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत पुसद जिल्ह्याचा प्रस्ताव पारित केला.
पुसद जिल्ह्यासाठी पुसद विकास मंचचे अ‍ॅड.सचिन नाईक, अभय गडम, निशांत बयास, अभिलेश खैरमोडे, साकीब शाह यांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला आहे. शनिवारी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ.अकील मेमन, नगरसेवक अ‍ॅड.उमाकांत पापीनवार, नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सतीश बयास, अभिजित चिद्दरवार, शिवाजीराव टेटर, बंडोपंत राऊत, बाळासाहेब वाढोरे आदींनी सत्याग्रह मंडपाला भेट दिली. पुसद जिल्हा झाला पाहिजे, असा ठराव निंबी, जवळा, शेंबाळपिंपरी, होरकड, मोप, काकडदाती या ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत पारित केला आहे. पुसद विकास मंचचे निशांत बयास, धनंजय सोनी, कैलास जगताप, पंकज पारधे, राहुल कांबळे, अ‍ॅड.कैलास राठोड, किरण देशमुख, नारायण पुलाते, देवेंद्र खडसे, मनोहरराव बनस्कर यांचाही आंदोलनात सहभाग आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Six Gram Panchayats took the resolution of creation of Pusad district