शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड शहरातील परिस्थिती ४८ तासानंतर आली पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 05:00 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील हेे दोन दिवसांपासून शहरात तळ ठाेकून आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्यांसह आरसीपीची दोन प्लाटून व इतर दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. दोन दिवसापूर्वी घडलेल्या घटनेत पोलिसांनी दोन्ही गटातील १४ आरोपींना ताब्यात घेतले. त्यापैकी आठ आरोपींची २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : सोशल मीडियावर आपत्तीजनक पोस्ट व्हायरल झाल्याने १७ डिसेंबरच्या रात्री शहरात तोडफोड व जाळपोळीची घटना घडली. त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैनात करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली. त्यामुळे येथील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील हेे दोन दिवसांपासून शहरात तळ ठाेकून आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्यांसह आरसीपीची दोन प्लाटून व इतर दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. दोन दिवसापूर्वी घडलेल्या घटनेत पोलिसांनी दोन्ही गटातील १४ आरोपींना ताब्यात घेतले. त्यापैकी आठ आरोपींची २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. या सहा दिवसात उर्वरित आरोपींची नावे समोर येताच कारवाई केली जाईल, असे ठाणेदार अमोल माळवे यांनी सांगितले.  रविवारी सकाळी १० वाजता शहरात पोलिसांनी पथसंचलन केले. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी व्यापाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आवाहन केले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी रविवारी आपली दुकाने उघडली. बाजारपेठ खुली झाली. तीन प्रकारच्या गुन्ह्यांतील आणखी ४ जणांना ताब्यात घेण्यात आले. आत्तापर्यंत ११  जणांना अटक करण्यात आल्याची माहिती डॉ. भुजबळ यांनी दिली. पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक- पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी शनिवारी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेतली. त्यांनी शहरात शांतता राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या बैठकीला प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, शांतता समिती सदस्य, व्यापारी, महसूलचे अधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Policeपोलिस