शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांकडूनच एकेरीचा फज्जा

By admin | Updated: July 17, 2014 00:21 IST

शहरातील दोन मार्ग वाहतुकीसाठी एकेरी करण्यात आले़ प्राशसनाने हा निर्णय जनतेच्या सुविधेसाठी घेतला़ तथापि अनेक वाहनधारकांना हा निर्णय अद्यापही पचनी पडला नाही. अनेक वाहनधारक एकेरीचे

वणी : शहरातील दोन मार्ग वाहतुकीसाठी एकेरी करण्यात आले़ प्राशसनाने हा निर्णय जनतेच्या सुविधेसाठी घेतला़ तथापि अनेक वाहनधारकांना हा निर्णय अद्यापही पचनी पडला नाही. अनेक वाहनधारक एकेरीचे उल्लंघन करून स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतात. संबंधित चौकातील वाहतूक पोलीस दूर उबे राहात असल्यानेही अनेकांना झटका बसत आहे.शहरातील दोन प्रमुख मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी पोलीस प्रशासनाने घेतला. हा निर्णय निश्चितच पोलिसांच्या स्वार्थासाठी नव्हे, तर शहरातील जनता आणि वाहनधारकांच्या सुविधेसाठीच होता. बेलगाम आणि अस्ताव्यस्त वाहतुकीला लगाम लावून सामान्य जनतेला त्रासमुक्त करण्यासाठी हा निर्णय होता. अनेक अडथळ्यानंतर या निर्णयाला मूर्तरूप प्राप्त झाले होते. त्यानुसार आता या दोनही मार्गाने एकेरी वाहतूक सुरू आहे. मात्र चौकाचौकात केवळ वाहतूक पोलीस असेपर्यंतच वाहनधारक एकेरीचा अवलंब करताना दिसून येतात. वाहतूक पोलीस तेथे न दिसल्यास अत्यंत सुजाण आणि सुशिक्षित वाहनधारकही बेलगामपणे तेथून आपले वाहन पुढे दामटतात.जिल्हा वाहतूक शाखेकडून येथील वाहतूक शाखेला चार चौक्या प्राप्त झाल्या आहे. त्या चार ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या चौक्यांमध्ये कधीच वाहतूक पोलीस दिसत नाही. ते दूर कुठेतरी उभे राहतात. त्यामुळे वाहनधारक तेथून सुसाट वेगाने पुढे निघतात. वाहनधारकांना शिस्त न लागल्याने असे प्रसंग वारंवार उद्भवतात. कारण दिवसभर रस्त्यावर पोलिसांचा ताफा ठेवणे पोलीस विभागालाही शक्य नाही़ त्यांना विविध सण, उत्सव, व्हायअपींचे दौरे याकडेही लक्ष द्यावे लागते. त्यामुळे वाहनधारकांनीच आता ही एकेरी वाहतूक आपल्या सुविधेसाठी आहे हे लक्षात घेऊन त्याची अंमलबजवणी करणे गरजेचे आहे. वाहनधारकांना अद्याप शिस्त न लागल्याने अनेकदा पोलिसांसोबत त्यांचे वादही होतात. त्यामुळे वाहनधारकांनीच स्वत:ला शिस्त लावून एकेरीचे पालन करणे आवश्यक आहे. तरच या एकेरी वाहतुकीचा लाभ होणार आहे. वाहनधारकांनी स्वत:ला शिस्त लावून घेतल्यास शहरात मोजक्याच वाहतूक पोलिसांची गरज भासणार आहे. त्यासाठी वाहनधारकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)