शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी अचानक बंद; हरभऱ्याला चढत आहे बुरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

नाफेडने १४ मार्च रोजी हरभऱ्याची खरेदी सुरू केली. उमरखेड परिसरातील एक हजार ९३० हरभरा उत्पादकांनी ऑनलाइन चणा विक्रीची प्रक्रिया पूर्ण केली. २४ मेपर्यंत खरेदी-विक्री संघाने परिस्थितीनुसार एक हजार शेतकऱ्यांना तोलाई संदेश दिला. या तारखेपर्यंत एक हजार शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी केला. मात्र ९३० हरभरा उत्पादकांचा माल खरेदी करण्यात आला नाही. आता त्यांनी घरात साठवून ठेवलेल्या हरभऱ्याला बुरशी चढत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : नाफेडने खरेदीची ऑनलाइन साइट अचानक बंद केल्याने हरभरा उत्पादक अडचणीत आला आहे. नाफेडच्या भरवशावर साठवून ठेवलेल्या हरभऱ्याला बुरशी चढत असल्याने मोठे नुकसान होण्याची भीती आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर नाफेडने घेतलेल्या या निर्णयामुळे बळीराजा कमालीचा अडचणीत आला आहे. नाफेडने १४ मार्च रोजी हरभऱ्याची खरेदी सुरू केली. उमरखेड परिसरातील एक हजार ९३० हरभरा उत्पादकांनी ऑनलाइन चणा विक्रीची प्रक्रिया पूर्ण केली. २४ मेपर्यंत खरेदी-विक्री संघाने परिस्थितीनुसार एक हजार शेतकऱ्यांना तोलाई संदेश दिला. या तारखेपर्यंत एक हजार शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी केला. मात्र ९३० हरभरा उत्पादकांचा माल खरेदी करण्यात आला नाही. आता त्यांनी घरात साठवून ठेवलेल्या हरभऱ्याला बुरशी चढत आहे. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. बी-बियाणांचे बजेट हरभरा विक्रीवर अवलंबून होते. मात्र अचानक झालेल्या बंदच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात यावा, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. 

२९ मेपूर्वीच क्लोज- नाफेडने ज्या ठिकाणी तोलाई एजन्सी निवडली होती, त्या एजन्सीला २९ मेपर्यंत खरेदीबाबत कळविले होते. परंतु नाफेडने अचानक ऑनलाइन साइट बंद करून गोंधळ उडवून देत शेतकऱ्यांपुढे अडचणींचा डोंगर उभा केला आहे. 

नाफेडकडून २९ मे रोजीपर्यंतच चणा खरेदी सुरू  ठेवावी, असा पत्रव्यवहार झाला होता. मात्र अचानक चार दिवस आधीच साइट बंद करण्यात आली. सोबतच अहवालही मागविला आहे. झालेल्या खरेदीची माहिती पाठविण्याची तयारी सुरू आहे. - विजय मानेसचिव, खरेदी-विक्री संघ, उमरखेड

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड