शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडच्या एफएम केंद्रासाठी शोले स्टाईल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 05:00 IST

केंद्र शासनाने येथील दूरदर्शन सहप्रक्षेपण केंद्र ३१ ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आदिवासी बहुल व मागास असलेल्या उमरखेड तालुक्यातील जनतेत रोष निर्माण झाला आहे. दूरदर्शन केंद्रामुळे या भागातील नागरिकांना मनोरंजन, कृषी विषयक बातम्या तसेच कोरोनाबाबत मार्गदर्शक माहिती मिळत आहे. या माहितीपासून आता त्यांना वंचित रहावे लागणार आहे. सन २०१५ मध्ये येथे एफएम केंद्र मंजूर करण्यात आले होते. मात्र हे केंद्र अद्यापही सुरू करण्यात आले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : येथील दूरदर्शन केंद्र ३१ ऑगस्टपर्यंत बंद करण्याचा इशारा प्रशासनाने दिला. त्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले असून दूरदर्शन केंद्र बंद करण्यापूर्वी येथे मंजूर झालेले एफएम केंद्र सुरू करावे अशी मागणी पुढे आली आहे. मंगळवारी याच मागणीसाठी युवकांनी दूरदर्शन केंद्राच्या टाॅवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.एफएम केंद्र सुरू करण्याचे लेखी आश्वासन जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला. त्यामुळे आंदोलनस्थळी एकच खळबळ उडाली. कोणताही अनर्थ घडू नये यासाठी टाॅवरच्या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता.केंद्र शासनाने येथील दूरदर्शन सहप्रक्षेपण केंद्र ३१ ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आदिवासी बहुल व मागास असलेल्या उमरखेड तालुक्यातील जनतेत रोष निर्माण झाला आहे. दूरदर्शन केंद्रामुळे या भागातील नागरिकांना मनोरंजन, कृषी विषयक बातम्या तसेच कोरोनाबाबत मार्गदर्शक माहिती मिळत आहे. या माहितीपासून आता त्यांना वंचित रहावे लागणार आहे. सन २०१५ मध्ये येथे एफएम केंद्र मंजूर करण्यात आले होते. मात्र हे केंद्र अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे येथील दूरदर्शन सहप्रक्षेपण केंद्र बंद करण्यापूर्वी एफएम केंद्र सुरू करावे, ही मागणी तीव्र झाली आहे. त्यासाठी मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सय्यद माजीद, प्रवीण इंगोले, अविनाश दुधे यांनी टाॅवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले. शहराध्यक्ष राहुल मोहितवार, अंकुश पानपट्टे, गोपाल झाडे व अन्य कार्यकर्ते दूरदर्शन केंद्रावर ठाण मांडून बसले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कोसळणाऱ्या पावसात आंदोलन सुरू असल्याने या आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण शहरवासीयांसह प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते.  आकाशवाणी केंद्राच्या मागणीचे पुढे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 

टॅग्स :agitationआंदोलन