काँग्रेसला सर्वाधिक सात तालुके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:00 AM2020-02-23T06:00:00+5:302020-02-23T06:00:07+5:30

शासकीय विश्रामभवनावर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत २१ जागांच्या वाटपावर चर्चा झाली. परंतु शनिवारी केवळ तालुका गटाच्या जागांबाबत निर्णय झाला. जिल्हा गट व आरक्षणाच्या जागांसाठी महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली, काही नावांवर एकमतही झाले. परंतु अद्याप त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.

Seven talukas to the Congress | काँग्रेसला सर्वाधिक सात तालुके

काँग्रेसला सर्वाधिक सात तालुके

Next
ठळक मुद्देजिल्हा बँक निवडणूक । महाविकास आघाडीची बैठक, तीन तालुके तूर्त अनिर्णीत

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी शनिवारी महाविकास आघाडीच्या बैठकीत तालुका गटाच्या जागांचे वाटप करण्यात आले. त्यात सर्वाधिक सात जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत.
शासकीय विश्रामभवनावर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत २१ जागांच्या वाटपावर चर्चा झाली. परंतु शनिवारी केवळ तालुका गटाच्या जागांबाबत निर्णय झाला. जिल्हा गट व आरक्षणाच्या जागांसाठी महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली, काही नावांवर एकमतही झाले. परंतु अद्याप त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. २८ फेब्रुवारीला महाविकास आघाडीची पुन्हा बैठक होणार असून त्यात हा निर्णय घेतला जाणार आहे. १६ तालुका गटापैकी उमरखेड, आर्णी, यवतमाळ, बाभूळगाव, मारेगाव, वणी व राळेगाव या सात जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. पुसद व महागाव राष्ट्रवादीकडे तर दिग्रस, नेर या जागा सेनेकडे आल्या आहेत.
झरी, दारव्हा आणि कळंब आदी जागांवर एकमत होऊ शकले नाही. तेथे काँग्रेस सोबतच शिवसेनेनेही दावा सांगितला आहे. दारव्ह्याची जागा काँग्रेस नेत्याला मुलासाठी तर कळंबची जागा शिवसेना नेत्याला काकासाठी हवी असल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नाही. परंतु आपसी तडजोडीने या दोन्ही जागांवर उपरोक्त दोन्ही पक्ष एकमेकाला सहकार्य करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला सर्वच प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी, उपनिबंधक निर्णय अधिकारी
दरम्यान २६ मार्च रोजी मतदान, २५ फेब्रुवारीपासून नामांकन, ४ एप्रिलला मतमोजणी या नियोजित निवडणूक कार्यक्रमाला राज्याच्या सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी मंजुरी दिली आहे. जिल्हा उपनिबंधक आर.एन. कटके यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Seven talukas to the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.