शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नेत्याची सात लाखांनी फसवणूक

By admin | Updated: May 28, 2015 01:56 IST

अमरावतीच्या युवकाने यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील शिवसेनेचे नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण मुनगीनवारसह पाच जणांची सात लाख रुपयांनी फसवणूक केली आहे.

यवतमाळ : अमरावतीच्या युवकाने यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील शिवसेनेचे नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण मुनगीनवारसह पाच जणांची सात लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. प्रथम श्रेणी न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांच्या आदेशावरून आर्णी पोलिसांनी भादंवि ४०६, ४२०, ३४ कलमाखाली गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात दिनेश श्रीरंग खांडरे (३८) रा.परमार अपार्टमेंट सातुर्णा अमरावती व पांडुरंग एन. कदम (४०) रा.देवगड नांदेड या दोघांना आरोपी बनविण्यात आले आहे. आर्णीतील शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण वामन मुनगीनवार (४०) व अन्य चौघांची याप्रकरणात फसवणूक झाली आहे. दिनेश व पांडुरंग हे काही दिवसांपूर्वी आर्णीला आले होते. त्यांनी आॅडिओ डॉट कॉम या कंपनीमध्ये पैसे गुंतविल्यास मोबाईलवर दररोज येणाऱ्या जाहिरातीतून नियमित कमाई सुरू होईल, असे आमिष दाखविले. या आमिषाला प्रवीण व त्यांचे सहकारी बळी पडले. या गुंतवणुकीसाठी आयसीआयसीआय बँकेचा खाते क्रमांक १४७५०५५००२१४ देण्यात आला होता. ठरल्यानुसार प्रवीण व सहकाऱ्यांनी सात लाख रुपयांची रक्कम या खात्यात टाकली. मात्र त्यानंतर हे खातेच बंद करण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल व्हावा म्हणून धडपड केली. पोलिसांनी प्रतिसाद न दिल्याने न्यायालयात धाव घेण्यात आली. अखेर न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा नोंदविला गेला. (प्रतिनिधी)